• Download App
    बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता Major accident in Bihar Boat capsizes in Sharyu River 18 drowned 7 missing

    बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता

    या घटनेत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ९ जणांना पोहण्यात यश आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    बिहार: सारण जिल्ह्यातील मांझी पोलीस स्टेशन हद्दीतील मतियार घाटाजवळ शरयू नदीत काल (बुधवार) संध्याकाळी बोट उलटली. बोटीवरील १८ जण नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी खलाशांचा शोध सुरू केला. या घटनेत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ९ जणांना पोहण्यात यश आले आहे. ७ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. Major accident in Bihar Boat capsizes in Sharyu River 18 drowned 7 missing

    वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कमल राय, साधू बीन, बजरंगी महतो, झिंगन महतो, पियुष कुमार, दीपक कुमार, प्रियांका कुमारी आणि मतियार गावातील बोट चालक त्रिलोकी बीन परतले आहेत. बोट उलटल्यानंतर या लोकांनी पोहून आपला जीव वाचवला.

    तर या घटनेत छठी देवी आणि फूल कुमारी यांचा मृत्यू झाला. सुभाष राय, भोला महतो, रोशनी कुमारी, तारा देवी, पिंकी कुमारी, चमेली देवी आणि रमिता देवी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

    उत्तर प्रदेशातील दियारा येथील मांझी ब्लॉकचे शेतकरी शेती करून परतत होते. यावेळी बोट नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले.

    Major accident in Bihar Boat capsizes in Sharyu River 18 drowned 7 missing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो