विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राला कोव्हिशिल्डचे नऊ लाख डोस मिळाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोस खरेदीचा आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.Maharashtra received nine lakh doses of Covishield, less number of corona patients in 15 districts
ते म्हणाले, सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे एक कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
- रेमडेसिव्हिरच्या जप्त केलेल्या ५००० कुप्या वापरण्यासाठी महाराष्ट्राला कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा
कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज नऊ लाख डोस मिळाले आहेत.
त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.आरोग्यमंत्री म्हणाले.
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील सुमारे एक लाख नागरिकांना लस दिली. या वयोगटातील लसीकरणाला गती येण्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोव्हॅक्सिनचे चार लाख ८९ हजार डोस खरेदीचा आदेश दिला आहे. स्पुटनिक व्ही लशीचे दर निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविणार आहोत.
Maharashtra received nine lakh doses of Covishield, less number of corona patients in 15 districts
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोरोनाची लागण
- कोल्हापुरात कडक लॉकडाऊन नव्हे, आता केवळ जनता कर्फ्युच ; काही तासांमध्ये निर्णय बदलला
- Corona Advisory : परराज्यात जाणाऱ्या निरोगी प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती नको ; आयसीएमआरची सूचना
- प्राण्यांनाही कोरोना, हैैद्राबादमधील आठ सिंह कोरोनाबाधित