विशेष प्रतिनिधी
मुंबई : पायाभूत सुविधा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल नंबर वरच राहिला असून फडणवीस सरकारच्या 2025 – 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी भरघोस तरतूद केली आहे. त्यामध्ये वाढवण बंदर विकासापासून ते विविध शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तार करण्यापर्यंतचा समावेश आहे. Maharashtra
पायाभूत सुविधांच्या तरतुदी अशा :
- पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26 % सहभाग
- वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडणार
- काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु होणार
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण
- महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित शोअर प्रकल्प
- महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता
- अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार
- आशियाई विकास बँक प्रकल्प, टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेणार.
- सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 36 हजार 964 कोटी रुपये किंमतीची 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3, सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3, एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार-प्रकल्प किंमत 30 हजार 100 कोटी रूपये
- स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करणार
- उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
- पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार
- तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित
मेट्रो :
मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे १० लाख प्रवाशांचा रोज लाभ
येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार, येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर
विमानतळ :
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार
- नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार
- नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण
- शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता- नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करणार
- अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण – 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करणार
- रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर
- गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु
- अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार
Maharashtra number one in infrastructure development
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde पंकजा मुंडे “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??
- रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव!!
- Suresh Raina : सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची हत्या करणारा असद पोलिस चकमकीत ठार
- Goa Police : गोवा पोलिसांची मोठी कारवाई, ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त