• Download App
    ये दिवाली पटाखोंवाली ! हिंदुत्ववादी संघटनांचा दणका - नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे । maharashtra government taken back firecrackers ban decision

    ये दिवाली पटाखोंवाली ! हिंदुत्ववादी संघटनांचा दणका – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे

    नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती.मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला इशारा आणि सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. maharashtra government taken back firecrackers ban decision


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक :  दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती.मात्र सामान्य नागरिक यावरून संतापले होते. हिंदुत्ववादी संघटना देखील नाराज असल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. maharashtra government taken back firecrackers ban decision

    राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती.



    हिंदुत्ववादी संघटना नाराज

    विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी थेट संवाद साधून फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

    महापालिकेत पडसाद उमटण्याआधीच निर्णय

    दरम्यान, फटाके बंदीच्या निर्णयाचे महापालिकेच्या महासभेत पडसाद उमटणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यापूर्वीच प्रशासनाने हा निर्णय जाहीर केल्याने वादावर पडदा पडला आहे.

    maharashtra government taken back firecrackers ban decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल