विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही आज दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.Maharashtra
आजच electoralsearch.eci.gov.in ह्या दुव्याला (link) भेट देऊन किंवा Voter Helpline ॲपवर मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे. नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी, तातडीने आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन एस.चोक्कलिंगम यांनी केले.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना आज रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम आजपर्यंत सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच आज दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले आहे.
Maharashtra Assembly Elections Today is the last chance to register your name in the voter list!!
महत्वाच्या बातम्या
- Tarun Chugh : फुकट आणि अनियंत्रित खर्चांमुळे पंजाब बरबाद झाला आहे – तरुण चुग
- Marathi Pali Prakrit : मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांच्या अभ्यासकांनी मोदी सरकारचे मानले आभार
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा झारखंड सरकारला 1 लाखांचा दंड; राज्य सरकार व PSUच्या निरुपयोगी याचिक; अधिकारी जबाबदार
- Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी; नाना पटोलेंसोबत चर्चा करण्यास उद्धव ठाकरे गटाचा नकार, काँग्रेसच्या वरिष्ठांशी करणार चर्चा