Friday, 2 May 2025
  • Download App
    महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली - देवेंद्र फडणवीस|Mahadev Jankar is the key to the treasure of Maharashtra Devendra Fadnavis

    महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली – देवेंद्र फडणवीस

    ..की दिल्लीची किल्ली सुद्धा त्यांच्या हातात येईल हा मला विश्वास आहे, असंही फडणवीस म्हणाले.


    विशेष प्रतिनिधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुती (रासपा) उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणीतील पाथरी रोड येथे सभा घेतली. या सभेस प्रचंड प्रतिसादही मिळाला. या महाविजय संकल्प सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं.Mahadev Jankar is the key to the treasure of Maharashtra Devendra Fadnavis

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ महादेव जानकर जमिनीवरील, तुमच्या-आमच्यातील नेते असून ते महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली देखील आहेत. महादेव जानकर यांना निवडून दिले की महाराष्ट्राची ही किल्ली परभणीकरांकडे येईल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी आम्ही कोणीही त्यांचा शब्द टाळू शकत नाहीत.’



    ‘यासोबतच येत्या काळात महादेव जानकर पंतप्रधान मोदी यांचा इतका विश्वास संपादन करतील की दिल्लीची किल्ली सुद्धा त्यांच्या हातात येईल हा मला विश्वास आहे. आता परभणीकरांना चिंता करण्याची गरज नाही.’ असंही फडणवीसांनी सांगितलं.

    ‘आधी ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’ असे म्हणले जायचे, परंतु येत्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतच जर्मनीच्याही पुढे जाणार आहे. महादेव जानकर हे पंतप्रधान मोदींप्रमाणेच एक फकीर. हे दोन नेते एकत्र आल्यावर परभणीच्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही.’ असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.

    महादेव जानकर यांचे निवडणूक चिन्ह असलेले शिट्टीचे बटन दाबले की वोट पंतप्रधान मोदींना मिळणार आहे. म्हणून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महादेव जानकर यांना मतदान करण्याचे परभणीवासीयांना आवाहन केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    Mahadev Jankar is the key to the treasure of Maharashtra Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vizhinjam Port चे उद्घाटन;; मोदी + अदानी + विजयन + थरूर यांची उपस्थिती, INDI आघाडीची झोप उडाली!!

    Ullu app : हाऊस अरेस्ट शो मध्ये अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या एजाज खान आणि विभू आगरवाल यांना NCW ची नोटीस!!

    CRPF jawan’s wife : CRPF जवानाच्या पत्नीला पाकिस्तानात पाठवले जाणार नाही; न्यायालयाने हद्दपारीला स्थगिती दिली