• Download App
    Local to Global: नागालँडची ‘किंग चिली’ चली लंडन : भारतातील सर तिखट मिरची-पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट Local to Global: Nagaland's 'King Chili' travels to London: India's hottest chili - Prime Minister Narendra Modi's special tweet

    Local to Global: नागालँडची ‘किंग चिली’ चली लंडन : भारतातील सर्वात तिखट मिरची-पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट

    • गुवाहाटीमधून पाठवण्यात आलेली ही मिर्ची जगातली सर्वात तिखट आहे .

    • या मिरचीची पहिली खेप नुकतीच लंडनमध्ये पोहोचली.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारतातील नागालँडमधील ‘किंग चिली’ उर्फ ‘भूत जोलकिया’ या नावाने ओळखली जाणारी मिर्ची पहिल्यांदाच लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.लोकल मार्केटमधून ही मिर्ची थेट ग्लोबल मार्केट मध्ये पोहचली आहे .पंतप्रधान मोदी नेहमीच लोकल उत्पादनांना ग्लोबल बाजारपेठेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देतात .आता ह्या मिर्चीने देखील अशीच लंडनची बाजारपेठ गाठली आहे .

    तिखटपणासाठी ही मिरची प्रसिद्ध आहे. ही जगातील सर्वात तिखट मिर्ची असल्याचे सांगितले जाते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास ट्विट 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, अतिश्य उत्तम बातमी. ज्या लोकांनी भूत जोलकिया मिरची खाल्ली आहे त्यांनाच या मिरचीच्या तिखटपणाची कल्पना आहे. तर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही ईशान्य भारतातील मिरची लंडनमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे.

     

    Scoville हीट यूनिट (SHUs) नुसार भूत जोलकिया ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. 2008 साली ही मिरची प्रमाणित करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये लंडनमध्ये या मिरचीचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर लंडनमधून या मिरचीसाठी ऑर्डर आली. ही मिरची पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवण्यात आली आहे. ही मिरची लवकर खराब होत असल्याने तिची निर्यात करण्यात अनेक समस्या होत्या. मात्र, या सर्व अडचणींवर मात करुन नागालँड कृषी बाजार समितीने ही मिरची लंडनमध्ये पाठवली.

    ही मिर्ची गुवाहाटीमधून पाठवण्यात आली आहे.

     

    Local to Global: Nagaland’s ‘King Chili’ travels to London: India’s hottest chili – Prime Minister Narendra Modi’s special tweet

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के