वृत्तसंस्था
गीर : भारतात विशेषत: गुजरातेतील गीर अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या स्थिर गतीने वाढत आहे. गुजरातेतील गीर अभयारण्यात सिंहांच्या संख्येत २९ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये गीरमध्ये ६७४ सिंहांची नोंद झाली. Lion population increasing in India
भारतात सिंहाच्या आशियाई, बंगाली आदी प्रजाती आढळतात. जैवविविधता व पर्यावरण संतुलनासाठी सिंह महत्वाचा आहे. सिंहामुळे हरणासारख्या प्राण्यांची संख्या मर्यादित राहते. त्यामुळे, भारतात सिंहांच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. जगात एका बाजूने सिंहांची संख्या कमी होत असतानात भारतात मात्र ती वाढत आहे. जगात सध्या वीस हजार सिंह असल्याचे मानले जाते.
दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस सिंहांच्या संवर्धनाविषयी जागृती करण्यासाठी जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी स्वयंसेवी संस्थांसह पर्यटन कंपन्याही विविध उपक्रम राबवितात. घटत्या संख्येमुळे सिंहांना धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत टाकले आहे. प्रामुख्याने शिकार, मनुष्याबरोबर संघर्षामुळे सिंहांच्या अस्तित्वावर गदा येत आहे.
Lion population increasing in India
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर
- काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य
- गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी
- सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले