• Download App
    भाजपचे 400 पार सोडून द्या, काँग्रेस स्वतःचे 40 तरी खासदार निवडून आणू शकेल का??; ममतांचा बोचरा सवाल!!|Let alone BJP's 400 pars, can Congress elect at least 40 MPs of its own??; Mamta's silly question!!

    भाजपचे 400 पार सोडून द्या, काँग्रेस स्वतःचे 40 तरी खासदार निवडून आणू शकेल का??; ममतांचा बोचरा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल राज्यसभेत बोलताना भाजपच्या आपकी बार 400 पार या घोषणेची खिल्ली उडविली, पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे 400 पार सोडून द्या, काँग्रेस स्वतःच्या बळावर स्वतःच्याच पक्षाचे 40 तरी खासदार निवडून आणेल का??, असा बोचरा सवाल करून काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्यातली हवा काढून घेतली.Let alone BJP’s 400 pars, can Congress elect at least 40 MPs of its own??; Mamta’s silly question!!



    राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी सातत्याने काँग्रेसला धारेवर धरले आहे. ही धार आणखी तीव्र करत ममतांनी काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणाचा समाचार घेतला. काँग्रेसला आम्ही पश्चिम बंगाल मध्ये लोकसभेच्या 2 जागा देऊ केल्या होत्या. कारण त्यांचे बंगाल मधून दोनच खासदार निवडून गेले आहेत, पण त्यांना जास्ती जागा हव्या होत्या म्हणून आम्ही त्यांना सांगितले, तुम्ही सगळ्या 42 जागा लढवा, असा टोमणा ममता बॅनर्जींनी हाणला.

    वास्तविक INDI आघाडी टिकून ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसला संपूर्ण देशात लोकसभेच्या 300 जागा लढवून उरलेल्या सगळ्या जागा आघाडीतल्या घटक पक्षांसाठी सोडायला सांगितले होते, पण काँग्रेस 300 जागा लढवण्यावर समाधानी नाही. त्यामुळे INDI आघाडीतले राजकीय सत्ता संतुलन बिघडले, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

    राहुल गांधींनी भारत जोडून न्याय यात्रा INDI आघाडीतल्याच घटक पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये काढली. काँग्रेसची हिंमत होती, तर त्यांनी हीच यात्रा भाजपशासित राज्यांमध्ये काढून तिथे स्वतःचा राजकीय पाया मजबूत करायचा होता. पण काँग्रेसमध्ये ती हिंमत नसल्यामुळे ते बाकीच्या राज्यांमध्ये फिरून आपल्याच INDI आघाडीतल्या घटक पक्षांचा घात करत आहेत. पण INDI आघाडीवर काँग्रेस पेक्षा कम्युनिस्ट पक्षाचा कंट्रोल असल्याने तो आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

    Let alone BJP’s 400 pars, can Congress elect at least 40 MPs of its own??; Mamta’s silly question!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!