वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ग्राम उजाला योजनेअंतर्गत फक्त १० रुपयात एलईडी बल्ब देण्यात येत असून गेल्या वर्षी एका दिवसांत १० लाख बल्बचे वाटप करण्यात आले आहे. ग्राम उजाला योजना बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येत आहे.LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day
सरकारी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (CESL) ग्राम उजाला योजनेंतर्गत ५० लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी योजने अंतर्गत केली आहे.
सीईएसएलने गेल्या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात १० रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब देण्याची योजना सुरू केली. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, २०२१ च्या निमित्ताने एकाच दिवसात १० लाख एलईडी बल्ब वितरित केले.
तीन वर्षांच्या हमीसह 7W आणि 12W एलईडी बल्ब कंपनीकडून दिले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त ५ बल्ब मिळू शकतात. वीज बचतीसह प्रखर प्रकाश असा दुहेरीसंगम साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day
महत्त्वाच्या बातम्या
- AANAND MAHINDRA : आनंद महिंद्रांनी ‘हा’ फोटो शेअर करत दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा-कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
- HAPPY NEW YEAR 2022 : जगभरात गुंजणार शंखनाद! नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काशी विश्वनाथ धाममधून 1001 जणांचा एकत्र शंखनाद
- ‘इश्क विथ नुसरत’ ! NUSRAT JAHAN च्या प्रेमात यशची कसरत ! मीडियापासून लपतछपत प्रेग्नन्सीमध्ये नुसरत जहाँच्या इच्छा पूर्ण केल्या
- मुलाला परत मिळविण्यासाठी त्या दोघांनी अखेर केले लग्न, केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारविरोधात दांपत्याचा लढा