• Download App
    'इंडिया' आघाडीचे नेते शिवराळ राजकारण करतात; कॉंग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही; नरेंद्र मोदींचा वर्ध्यात हल्लाबोल|Leaders of 'India' front do Shivral politics; Congress did not allow development of Vidarbha; Narendra Modi attack in Vardha

    ‘इंडिया’ आघाडीचे नेते शिवराळ राजकारण करतात; कॉंग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही; नरेंद्र मोदींचा वर्ध्यात हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहीला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. NDAने गेल्या दहा वर्षात केलेल्या देशातील विकासामुळे विरोधकांचे तोंड बंद झाले आहेत. आता तर कॉंग्रेसचे युवराज देशात आग लावण्याचे काम करत आहे. संविधान तोडण्याचा अपप्रचार केला जात आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला.Leaders of ‘India’ front do Shivral politics; Congress did not allow development of Vidarbha; Narendra Modi attack in Vardha

    ते विदर्भातील वर्धा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करत होते. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा व वर्धा लोकसभेचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. यावेळी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती.



    नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीच्या लोकांना मतदान करणे म्हणजे तुमचे मत बर्बाद करणे आहे. महाराष्ट्रातील लोकांनी व देशातील जनतेने ठरवून टाकले आहे की, विकासाला मतदान करायचे आहे. देशातील सर्व विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी फिर एक बार चारसो पार असा नारा यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिला.

    2024ची लोकसभा निवडणूक ही आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची आहे, विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणूक आहे, यात वर्धा व अमरावती लोकसभेतील लोकांचा आम्हाला आशीर्वादाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

    मोदी पुढे बोलताना म्हणाले की, वर्धा ही संतांची भूमी आहे. देशातील लोकांना असे वाटत होते की, देशाचा विकास होऊच शकत नाही. शेतकऱ्यांना असे वाटत होते की, त्यांच्या मालाला किंमत मिळणार नाही. पण ज्यांना कोणीही विचारले नाही, त्यांना गरीबाच्या या मुलाने पूजन केले आहे. 25 टक्के लोकांना गरीबीतून बाहेर काढले आहे. गावोगावी वीज पुरवठा केला. 11 कोटी लोकांना पाणी पुरवठा केला. 4 कोटी लोकांना पीएम आवास योजना मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

    Leaders of ‘India’ front do Shivral politics; Congress did not allow development of Vidarbha; Narendra Modi attack in Vardha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार