• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधी यांच्या संमतीविनाच वकिलांनी न्यायालयात केला

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या संमतीविनाच वकिलांनी न्यायालयात केला जिवाला धोका असल्याचा दावा

    Rahul Gandhi

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Rahul Gandhi  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी पुणे न्यायालयात लेखी स्वरूपात केला. मात्र, हा दावा करण्यापूर्वी राहुल गांधी यांची संमती घेतली नसल्याचे उघड झाले आहे.Rahul Gandhi

    बुधवारी पुणे न्यायालयात सावरकर मानहानी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला कळवले की “मत चोरी” प्रकरण उघड झाल्यानंतर राहुल गांधींवरील धोका वाढला आहे. हे विधान माध्यमांत आल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी X वर पोस्ट करून स्पष्ट केले की, राहुल गांधींना याबाबत सहमती नव्हती आणि ते याच्याशी असहमत आहेत. त्यामुळे वकील हे विधान न्यायालयातून मागे घेतील.Rahul Gandhi



    राहुल गांधींच्या वकिलांनी खासदार-आमदार विशेष न्यायालयात अर्ज दाखल करून, खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीसाठी प्रतिबंधात्मक संरक्षण देण्याची मागणी केली. त्यांनी नमूद केले की भाजप नेते आर. एन. बिट्टू यांनी राहुल यांना दहशतवादी म्हटले होते, तर भाजप नेते तरविंदर मारवाह यांनी “योग्य वर्तन न केल्यास आजीसारखेच भोगावे लागेल” अशी धमकी दिली होती.

    या प्रकरणातील तक्रारदार सात्यकी हे सावरकर आणि गोडसे कुटुंबांशी संबंधित असून, त्यांच्या प्रभावाचा गैरवापर होऊ शकतो, असे वकिलांनी सांगितले. राहुल गांधींवर हिंदू समुदायाचा अपमान केल्याचा आरोप असून, त्यांनी केलेल्या वक्तव्यात “खरा हिंदू हिंसक नसतो, द्वेष पसरवत नाही” असे म्हटले होते आणि भाजपवर द्वेष व हिंसा पसरवल्याचा आरोप केला होता. खटल्याची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

    Lawyers claim threat to life in court without Rahul Gandhi’s consent

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonia Gandhi, : सरकारने म्हटले- नेहरूंशी संबंधित कागदपत्रे सोनिया गांधींकडे; संसदेत संबित पात्रा यांनी हे गायब झाल्याचा आरोप केला होता

    नेहरूंना सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य, पण त्यांना भारतरत्न द्यायला विरोध!!; पुरावा समोर

    Shivraj Singh Chauhan : लोकसभेत ‘VB-जी राम जी’ विधेयकावर चर्चा; कृषी मंत्री शिवराज म्हणाले- बिलात रोजगाराचे दिवस 100 वरून 125 केले