• Download App
    Upendra Kushwaha '१० दिवसांत मारून टाकू', लॉरेन्स बिश्नोई

    Upendra Kushwaha : ‘१० दिवसांत मारून टाकू’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून उपेंद्र कुशवाह यांना धमकी!

    Upendra Kushwaha

    जाणून घ्या, कुशवाह यांनी यांसदर्भात एक्सवर पोस्ट करून काय म्हटले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – Upendra Kushwaha राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार उपेंद्र कुशवाह यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उपेंद्र कुशवाह यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही धमकी मिळाली आहेUpendra Kushwaha

    लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून कथितरित्या जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर उपेंद्र कुशवाह म्हणाले की, मला १० दिवसांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की,, “काल मला २-३ फोन कॉल आणि एक मेसेज आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की मला १० दिवसांत मारले जाईल. फोन करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य म्हणून सांगितले.



    १९ जून रोजी त्यांनी एक्स-पोस्टवर लिहिले, ”आज संध्याकाळी ८:५२ ते ९:२० दरम्यान, मला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने +९१६३०५१२९१५६ आणि +९१९२२९५६७४६६ या मोबाईल क्रमांकांवरून सलग ७ धमकीचे कॉल आले. तसेच, रात्री ८:५७ वाजता, +९१७५६९१९६७९३ या मोबाईल क्रमांकांवरून, एमएमएस/एसएमएसद्वारे असे सांगण्यात आले की जर मी एखाद्या विशिष्ट पक्षाविरुद्ध राजकीयदृष्ट्या बोलत राहिलो, तर मला परिणाम भोगावे लागतील. मला १० दिवसांत संपवले जाईल, अशी धमकीही दिली गेली.

    याप्रकरणी एसएसपी पाटणा यांनी तत्काळ दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. लोकशाही व्यवस्थेत अशा धमक्या अस्वीकार्य आहेत. हा संपूर्ण प्रकरण त्वरित निकाली काढावं अशी अपेक्षा आहे. असंही कुशवाह यांनी सांगितलं आहे.

    Lawrence Bishnoi gang threatens Upendra Kushwaha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम