वृत्तसंस्था
पाटणा – चारा गैरव्यवहारात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. एक -दोन दिवसांत ते तुरुंगातून बाहेर येतील. Lalu Prasad will release soon from jail
चारा गैरव्यवहारातील दुमका कोशागारातून अवैधरीत्या पैसे काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यांना झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश कुमारसिंह यांनी नुकताच जामीन मंजूर केला. मात्र न्यायलयीन कामकाजात वकील सहभागी न झाल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. आता ‘बीसीआय’च्या निर्णयानंतर एक-दोन दिवसांत लालूंची सुटका होऊ शकेल, असे सांगण्यात आले.
लालूंसह ज्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी मंजूर केला आहे, त्यांचीही सुटका होणार आहे. त्यांचे वकील जामिनाची हमी रक्कम भरू शकणार आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) जनरल कौन्सिलने हा निर्णय बुधवारी घेतल्याने लालू प्रसाद यांच्या सुटकेतील अडथळे दूर झाले आहेत. ‘बीसीआय’चे संयुक्त सचिव अशोक कुमार पांडेय यांनी राज्याच्या बार कौन्सिलला पत्र लिहून याबाबत माहिती दिली.
Lalu Prasad will release soon from jail
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले, पीएम केअरमधून होणार आता एक लाख कॉन्सन्ट्रेटरची खरेदी होणार
- अमेरिकेत १०० तासांत ६६ हजार भारतीयांनी उभारला ४७ लाख डॉलरचा निधी, भारतासाठी मदत करणार
- रश्मी शुक्ला यांनी ‘सीबीआय’ला मंत्र्यांच्या भ्रष्ट आचरणाची दिली माहिती?
- दिल्लीतील केजरीवाल सरकारलाच लोक मरताना पाहायचेत, रेमडेसिव्हीरच्या प्रोटोकॉलवर उच्च न्यायालय भडकले
- हवाई दलाचे कोव्हिड योद्धे सज्ज; अवजड वाहतुकीची विमाने २४ तास तत्पर