• Download App
    Lakhimpur Violence : लखीमपूर प्रकरणात एसआयटीचे ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल, गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगा मुख्य आरोपी । Lakhimpur Violence SIT files 5000 page chargesheet in Lakhimpur case, Home Minister son main accused

    Lakhimpur Violence : लखीमपूर प्रकरणात एसआयटीचे ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल, गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगा मुख्य आरोपी

    Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. एसआयटीने हे आरोपपत्र सीजेएम न्यायालयात दाखल केले. आशिष मिश्रासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपपत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे निकटवर्तीय वीरेंद्र शुक्ला यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आता मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रासह एकूण 16 आरोपी आहेत. Lakhimpur Violence SIT files 5000 page chargesheet in Lakhimpur case, Home Minister son main accused


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. एसआयटीने हे आरोपपत्र सीजेएम न्यायालयात दाखल केले. आशिष मिश्रासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपपत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे निकटवर्तीय वीरेंद्र शुक्ला यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आता मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रासह एकूण 16 आरोपी आहेत.

    गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीने चिरडले.

    केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर 4 शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. आशिष मिश्रा त्याच्या साथीदारांसह वरील आरोपात तुरुंगात आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Lakhimpur Violence SIT files 5000 page chargesheet in Lakhimpur case, Home Minister son main accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार