• Download App
    आशिष मिश्रा नोटीस असूनही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत, सकाळी 10ची दिली होती वेळLakhimpur Kheri Case Ashish Mishra did not appear before the crime branch despite the notice, silence at home too

    Lakhimpur Kheri Case : आशिष मिश्रा नोटीस असूनही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत, सकाळी 10ची दिली होती वेळ

     

    लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा शुक्रवारी गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. गुन्हे शाखेने आशिष मिश्रांच्या घरी नोटीस लावून त्यांना आज सकाळी 10 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. आशिष मिश्रा यांचे नाव एफआयआरमध्ये आहे. आशिष हे लखीमपूरच्या टिकुनियामध्ये 4 शेतकऱ्यांचा बळी गेल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. आशिष मिश्रा हे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे सुपुत्र आहेत. Lakhimpur Kheri Case Ashish Mishra did not appear before the crime branch despite the notice, silence at home too


    प्रतिनिधी

    लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा शुक्रवारी गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. गुन्हे शाखेने आशिष मिश्रांच्या घरी नोटीस लावून त्यांना आज सकाळी 10 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. आशिष मिश्रा यांचे नाव एफआयआरमध्ये आहे. आशिष हे लखीमपूरच्या टिकुनियामध्ये 4 शेतकऱ्यांचा बळी गेल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. आशिष मिश्रा हे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे सुपुत्र आहेत.

    दुसरीकडे, आशिष मिश्रा यांच्या घराबाहेरही शांतता आहे. ते घरीही नाहीत. पोलिसांनी काल मंत्र्याच्या घराबाहेर नोटीस चिकटवली होती.

    काल, यूपी पोलिसांकडून आशिष मिश्रा यांच्या संदर्भात एक निवेदन आले. आयजी (लखनौ रेंज) लक्ष्मी सिंह यांनी सांगितले होते की, पोलीस आशिष मिश्राचा शोध घेत आहेत, त्यांची चौकशी करावी लागेल. याआधी आशिष मिश्रा माध्यमांसमोर सतत मुलाखती देत होते, पण आता अचानक ते गायब झाले आहेत.

    दोन आरोपींना अटक

    लखीमपूर खेरी प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. यामध्ये आशिष पांडे आणि लवकुश यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत दोघेही सहभागी होते आणि ते जखमीही झाले होते. पोलिसांवर दबाव होता की, घटनेच्या इतक्या दिवसांनंतरही आजपर्यंत कोणाचीही चौकशी झालेली नाही किंवा अटकही झालेली नाही. गुरुवारी सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची सुनावणी केली, तेव्हा यूपी सरकारकडून या प्रकरणाचा सद्य:स्थिती अहवाल काय आहे याची माहिती मागितली. यामध्ये किती लोकांना अटक करण्यात आली, किती एफआयआर, चौकशी आयोग इत्यादींची माहिती मागवण्यात आली आहे.

    लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर चार लोकांचाही मृत्यू झाला. त्यात दोन भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एक पत्रकार यांचा समावेश होता. यूपी सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना 45-45 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

    Lakhimpur Kheri Case Ashish Mishra did not appear before the crime branch despite the notice, silence at home too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित