पाकिस्तानातील लाहोर शहरात एकापाठोपाठ एक चार भीषण स्फोट झाले, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील लाहोरी गेटजवळ हा स्फोट झाला.Lahore Blasts Four consecutive blasts in Lahore, Pakistan, 5 killed, 20 injured
वृत्तसंस्था
लाहोर : पाकिस्तानातील लाहोर शहरात एकापाठोपाठ एक चार भीषण स्फोट झाले, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील लाहोरी गेटजवळ हा स्फोट झाला.
स्फोट इतका जोरदार होता की घटनास्थळाच्या आजूबाजूच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्याचबरोबर जवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
लाहोरचे ऑपरेशन्सचे उपमहानिरीक्षक डॉ. मुहम्मद आबिद खान यांनी जिओ न्यूजला सांगितले की, तपास सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र स्फोटामागचे खरे कारण लवकरच कळेल. स्फोटामुळे जमिनीच्या आत दीड फूट खोल खड्डा तयार झाला होता. स्फोटात जखमी झालेल्यांना शहरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटासाठी घटनास्थळी आधीच बॉम्ब पेरण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी जिओ न्यूजला दिली आहे. या लाहोरी गेट परिसरात दररोज मोठ्या संख्येने लोक खरेदी-विक्रीसाठी येतात.
स्फोटात जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेयो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली
असून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. हा आयईडी होता की टाईम बॉम्ब होता हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान मदतकार्यात गुंतलेले दिसत आहे.
Lahore Blasts Four consecutive blasts in Lahore, Pakistan, 5 killed, 20 injured
महत्त्वाच्या बातम्या
- धुळ्यात साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी ; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू
- इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज होणार सुनावणी
- देशाबद्दल खोटी माहिती पसरवणारे युट्यूब चॅनेल्स आणि संकेतस्थळ होणार ब्लॉक-अनुराग ठाकूर