यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना 1 जूनला आणि अंतिम सामना 29 जूनला होणार आहे.Know About Indian who will lead the American cricket team, Preparations for T20 World Cup begins
T-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जातील. अमेरिकेत टी-20 क्रिकेट विश्वचषक पहिल्यांदाच होत आहे. सह यजमान असल्याने अमेरिकेचा क्रिकेट संघही या स्पर्धेत खेळणार आहे.
विशेष म्हणजे अमेरिकन क्रिकेट संघाचा कर्णधार भारतीय तरुण आहे. मोनांक पटेल अमेरिकन क्रिकेट संघाची कमान सांभाळतील. मोनांक पटेल मूळचे गुजरातचे. तो गुजरातकडूनही खेळला आहे. तो 2018 पासून अमेरिकेसाठी क्रिकेट खेळत आहे.
1 मे 1993 रोजी आनंद, गुजरात येथे जन्मलेला मोनांक पटेल हा उजवा हाताचा फलंदाज तसेच यष्टिरक्षक आहे. तो गुजरातकडून 16 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील संघात खेळला आहे.
1 मे 1993 रोजी आनंद, गुजरात येथे जन्मलेला मोनांक पटेल हा उजवा हाताचा फलंदाज तसेच यष्टिरक्षक आहे. तो गुजरातकडून 16 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील संघात खेळला आहे.
2010 मध्ये पटेल यांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले. आणि तो 2016 पासून अमेरिकेत राहत आहे. 2018 मध्ये झालेल्या ICC वर्ल्ड T20 अमेरिका क्वालिफायर स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये त्याने 208 धावा केल्या.
ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या प्रादेशिक सुपर-50 स्पर्धेसाठी तो यूएस क्रिकेट संघातही होता. त्या स्पर्धेत त्याने जमैकाविरुद्ध शतक झळकावले होते. शतक झळकावणारा तो पहिला अमेरिकन क्रिकेटर आहे. त्या स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 290 धावा केल्या होत्या. पुढच्या महिन्यात पुन्हा त्याचा आयसीसी स्पर्धेत क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. पहिल्याच सामन्यात त्याने युगांडाविरुद्ध 107 धावांची खेळी केली होती.
पटेलने 15 मार्च 2019 रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले. यूएई विरुद्ध त्याने पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वेळी, 27 एप्रिल 2019 रोजी, त्याने पापुआ न्यू गिनी विरुद्ध पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
ऑगस्ट 2021 मध्ये, पटेलने ओमानमध्ये झालेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. ऑक्टोबर 2021 मध्ये, तो अमेरिकन क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेला.
Know About Indian who will lead the American cricket team, Preparations for T20 World Cup begins
महत्वाच्या बातम्या
- 2 आठवड्यांत क्राउड फंडिंगमधून काँग्रेसला मिळाले फक्त 11 कोटी, आता कार्यकर्त्यांना मिळाली ही सूचना
- भारताचा विकासदर अंदाजाच्याही पुढे; या वर्षी 7.3% वेगाने वाढणार GDP
- टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या क्रिकेटपटूविरुद्ध FIR दाखल, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
- आयोगाने बोलावली राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक; फेब्रुवारीअखेर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता