• Download App
    शाश्वत विकासात केरळची बाजी ; बिहारची कामगिरी वाईट : निति आयोगाच्या अहवालात बाब स्पष्ट।Kerala Tops Again Bihar Last In NITI Aayog Sustainable Development Index

    शाश्वत विकासात केरळची बाजी ; बिहारची कामगिरी वाईट ; निति आयोगाच्या अहवालात बाब स्पष्ट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शाश्वत विकासात केरळने पुन्हा बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी दुसरा क्रमांक मिळविला असून बिहारची कामगिरी वाईट ठरली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. Kerala Tops Again Bihar Last In NITI Aayog Sustainable Development Index

    निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गुरुवारी ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’(एसडीजी)तिसरा एसडीजी निर्देशांक २०२० -२०२१ जारी केला. त्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या विकासाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक मापदंडांवर मूल्यमापन केले जाते. यात ७५ गुणांसह केरळ अव्वलस्थानी राहिला. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी ७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. बिहार, झारखंड आणि आसाम यांची कामगिरी सर्वाधिक वाईट राहिली आहे.

    केंद्रशासित प्रदेशांत ७९ गुणांसह चंदीगड प्रथमस्थानी राहिले. ६८ गुण घेऊन दिल्ली दुसऱ्या स्थानी राहिली. २०२०-२१ मध्ये मिझोरम, हरयाणा आणि उत्तराखंड यांनी अनुक्रमे १२, १० आणि ८ गुणांची वाढ मिळवून कामगिरी सुधारणाऱ्या राज्यांत सर्वोच्च स्थान मिळविले.



    भारताने ६ गुणांची सुधारणा

    एकूण एसडीजी गुणांत भारताने ६ गुणांची सुधारणा केली आहे. २०१९ मध्ये भारताचे एकूण गुण ६० होते. ते २०२०-२१ मध्ये ६६ झाले आहेत. उद्दिष्ट-६ (शुद्ध पाणी व स्वच्छता) आणि उद्दिष्ट-७ (किफायतशीर व स्वच्छ ऊर्जा) यात चांगली सुधारणा झाल्याने ही गुणवाढ झाली आहे. या दोन्ही उद्दिष्टांत भारताला अनुक्रमे ८३ आणि ९२ गुण मिळाले आहेत.

    फ्रंट-रनर श्रेणीत महाराष्ट्राला स्थान

    २०१९ मध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ‘फ्रंट-रनर’ अशी एक स्वतंत्र श्रेणी तयार केली होती. ६५ ते ९९ गुण असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा त्यात समावेश झाला होता. २०२०-२१ मध्ये ‘फ्रंट-रनर’ श्रेणीत आणखी १२ राज्ये समाविष्ट झाली. त्यात उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.

    Kerala Tops Again Bihar Last In NITI Aayog Sustainable Development Index

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- सेवानिवृत्त सैनिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाही; निश्चित सुविधा आणि रोजगारही नाही

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- माझ्यावर तुष्टीकरणाचे आरोप, पण मी धर्मनिरपेक्ष; लोक गुरुद्वारात गेल्यावर शांत राहतात