विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 52 टक्के सक्रिय बाधित रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत तर त्याखालोखाल संख्या महाराष्ट्राची असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली.Kerala ranks first among the active corona cases in the country, while Maharashtra ranks second, with only half the patients in Kerala
मागील काही दिवसांपासून केरळ येथील नव्या बाधितांची संख्या घटत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तरी देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अद्यापही केरळ येथेच आढळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. केरळ येथे सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित रूग्ण आहेत.
ही संख्या देशातील एकूण सक्रिय बाधितांच्या 52 टक्के म्हणजेच 1,44,000 इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 40,000, तामिळनाडू येथे 17,000, मिझोराम येथे 16,800, कर्नाटकात 12,000 तर आंध्र प्रदेशात 11,000 हुन अधिक सक्रिय बाधित आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली.
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 98 टक्के झाला आहे. सक्रिय बाधितांची संख्या देशभरामध्ये कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. रोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये घट करण्यात आली नसून दररोज 15 ते 16 लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
पॉझिटिव्हिटी दर देखील कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी दर 3 टक्क्यांपेक्षा कमी येत असलेला हा सलग 13 वा आठवडा आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी करणे हेच आपले ध्येय असायला हवे. सर्व राज्य सरकारांनी हेच ध्येय निश्चित करून काम करायला हवे, असे भूषण यावेळी म्हणाले.
देशातील 18 जिल्ह्यांमध्ये अद्यापही पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांदरम्यान आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये 23,529 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण सक्रिय बाधितांची संख्या 2,77,020 असून ती गेल्या 195 दिवसांतील सर्वात कमी आहे. सध्याची सक्रिय बाधितांची संख्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.82 टक्के एवढी आहे.
Kerala ranks first among the active corona cases in the country, while Maharashtra ranks second, with only half the patients in Kerala
महत्त्वाच्या बातम्या
- भंगारातून रेल्वेने केली 227.71 कोटी रुपयांची कमाई
- शशी थरूर, मनीष तिवारी यांनीही कपिल सिब्बल यांची बाजू उचलून धरली!!
- नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 38 रूग्णवाहिकांची केली मागणी
- पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष
- 2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा