• Download App
    केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता । Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going

    केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता

    वृत्तसंस्था

    कोट्टायम : केरळमध्ये शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य भागामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर कोट्टायम आणि इडुक्कीत भूस्खलनानंतर २२ जण बेपत्ता झाले आहेत. Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going

    राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. पूर परिस्थिती पाहता सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

    आजही अतिवृष्टीचा इशारा

    मुसळधार पावसामुळे केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. हवामान विभागाने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात न जाण्याचे आवाहन केलं आहे. तिकडे राज्यातील पंबा नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे.



    मुख्यमंत्र्यांची आपात्कालीन बैठक

    केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी रात्री तातडीची बैठकघेतली ते म्हणाले की लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली आहे. जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू केले आहे. सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

    पाच जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी

    भारतीय हवामान विभागाने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोट्टायम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे.

    Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य