विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब पोलिसांच्या वतीने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर सातत्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कुमार विश्वास यांच्यापूर्वी दिल्ली भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा, नवीन कुमार जिंदाल आणि प्रीती गांधी यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. Kejriwalji, be a little ashamed Congress leader Alka Lamba’s tweet
पंजाब पोलिस बुधवारी सकाळपासूनच अॅक्शन मोडमध्ये आहेत. ‘आप’चे बंडखोर नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्यानंतर आता पंजाब पोलिस ‘आप’च्या माजी आमदार आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या घरी पोहोचले आहेत.
खुद्द अलका लांबा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, पंजाब पोलिस माझ्या घरी पोहोचले आहेत. याआधी जेव्हा पंजाब पोलिस कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले होते, तेव्हा अलका यांनी ट्विटमध्ये लिहिले होते, आता मला समजले की तुम्हाला पोलिसांची गरज का आहे.
त्या ट्विटमध्ये अलका यांनी लिहिले की, ‘आता तुम्हाला समजले पाहिजे की तुम्हाला पोलिस का हवे आहेत.. तुमच्या विरोधकांना घाबरवण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपप्रमाणेच. केजरीवालजी, थोडी लाज बाळगा.’
दरम्यान, पंजाब पोलीस बुधवारी सकाळी कवी आणि ‘आप’चे बंडखोर नेते डॉ. कुमार विश्वास यांच्या घरी कारवाईसाठी पोहोचले. यावर कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नाव न घेता इशारा दिला.
कुमार विश्वास यांनी ट्विट करून लिहिले की, “पहाटे पंजाब पोलीस दारात आले आहेत. एकेकाळी माझ्यामुळे पक्षात गेलेले भगवंत मान यांना मी इशारा देत आहे की, दिल्लीत बसलेला माणूस ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचा विश्वासघात करेल. तसेच देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा.”