विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एरवी सनातन धर्माला घाला शिव्या, पण दारू घोटाळ्यातून सुटण्यासाठी हनुमानाला नवस बोला!! हा फंडा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी वापरला दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन दिल्यानंतर ते कॅनॉट प्लेस मधल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासमवेत सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे मंत्री आणि कार्यकर्ते होते. या सर्वांनी केजरीवालांच्या सुटकेबद्दल हनुमानाची प्रार्थना केली.Kejriwal first went with abusive people of Santana, but fallen at feet of hanuman after his arrest
पत्नी सुनीता केजरीवाल या स्वतः त्यांना हनुमान मंदिरात घेऊन आल्या होत्या. कारण केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर त्यांची सुटका व्हावी, यासाठी सुनीता केजरीवाल यांनी तसा नवस बोलला होता. केजरीवाल यांना जरी फक्त अंतरिम जामीन मिळाला असला, तरी त्यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आणि ते सुखरूप घरी आले म्हणून तो नवस फेडण्यासाठी सुनिता केजरीवाल यांना घेऊन हनुमान मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी स्वतःची माहिती दिली. सहसा मनी लॉन्ड्रीग केस मध्ये पीएमएलए कोर्टातून कुठल्या आरोपीची सुटका होत नाही. परंतु हनुमानाच्या चमत्कारामुळे केजरीवाल्यांची सुटका झाली, असे उद्गार सौरभ भारद्वाज यांनी काढले.
पण एरवी सनातन धर्माला घाला शिव्या आणि तुरुंगातून सुटकेसाठी हनुमानाला नवस बोला!!, हा फंडा केजरीवालांनी वापरल्यास यातून दिसून आले. केजरीवाल ज्या “इंडिया” आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षांचे सगळे नेते सनातन धर्माला शिव्या घालतात. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांची तळी उचलून हिंदूंना दुय्यम लेखतात. हिंदू सण आणि हिंदूंच्या भावभावनांना किंमत देत नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांचा मुलगा उदयनिती स्टालिन याने सनातन धर्म हा डेंग्यू, मलेरिया, एड्स सारखा रोग असल्याने त्याचे निर्मूलन करावे, असे अश्लाघ्य उद्गार काढले होते. त्यावेळी केजरीवाल मूग गिळून गप्प बसले होते. त्यांनी सनातन धर्माची बाजू उचलून धरली नव्हती.
पण आता खुद्द त्यांच्यावरच दारू घोटाळ्यात आरोप झाले, त्यांना अटक होऊन त्यांना तुरुंगात राहावे लागले, त्यावेळी मात्र सुनीता केजरीवालांना हनुमानाची आठवण झाली आणि त्यांनी केजरीवालांच्या सुटकेसाठी नवस बोलला. केजरीवाल्यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर नवस फेडण्यासाठी त्यांच्या समित्या समवेत त्या हनुमान मंदिरात पोहोचल्या.
Kejriwal first went with abusive people of Santana, but fallen at feet of hanuman after his arrest
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्यावर आरोप निश्चित; दिल्ली न्यायालयात सुनावणी
- पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने
- ठाकरे + पवार + काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मशिदींमधून फतवे; राज ठाकरेंचा गंभीर इशारा!!
- निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारलं!