केजरीवाल + पवार बनले एका माळेचे मणी राहुल गांधींच्या पायाखालची ओढली “अदृश्य फळी”!!, हे सहज सुचले किंवा यमक जुळवायचे म्हणून दिलेले शीर्षक नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 21 दिवसांसाठी बाहेर आल्यानंतर आज केलेले भाषण आणि शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत यांच्यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर शीर्षकाचे खरे राजकीय इंगित समजेल. Kejriwal and pawar targets Modi verbally, but targets rahul Gandhi in real terms
केजरीवाल आणि पवार यांच्या वक्तव्याचा खरा अर्थ हाच आहे की, 2024 च्या निवडणुकीमध्ये काहीही झाले, तरी मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच निवडून येईल आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालची इंडी आघाडी पराभूत होईल. मग भले केजरीवाल आणि शरद पवार हे उघडपणे मोदी विरोधात बोलत असतील, पण प्रत्यक्षात मात्र त्यांची राजकीय कृती आणि त्यांच्या बोलातले “बिटवीन द लाईन्स” हे काँग्रेस विरोधीच आहे!!
आता केजरीवालांचे भाषण पाहा ना…
केजरीवालांनी 21 दिवसांसाठी बाहेर येऊन केलेल्या भाषणात धडाधड राजकीय भाकिते वर्तवून टाकली. मोदी पंतप्रधान बनणारच नाहीत. ते पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षाचे होऊन रिटायर्ड होतील. ते अमित शहांना पंतप्रधान करतील. ते योगी आदित्यनाथ यांना बाजूला करतील वगैरे भाकिते” केजरीवालांनी केली. ही भाकिते करताना त्यांनी मोदींवर जबरदस्त प्रहार केले. सगळी भाषा आक्रमकपणे मोदीविरोधी ठेवली, पण भाजपसाठी ही “सकारात्मक” भाकिते करून ते थांबले नाहीत, त्या पलीकडे जाऊन नव्या राजवटीत आपल्या पाठोपाठ कोण तुरुंगात जाईल??, याची नावांसकट “भाकिते” केजरीवालांनी वर्तविली. ममता बॅनर्जी तुरुंगात जातील, उद्धव ठाकरे तुरुंगात जातील, स्टालिन साहेब तुरुंगात जातील, पिनराई विजयन तुरुंगात जातील, तेजस्वी यादव तुरुंगात जातील, अशी “भाकिते” केजरीवालांनी नोंदविली, पण या भाकितांमधून त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांना वगळले. सगळे विरोधक तुरुंगात जातील, असे “भाकीत” वर्तविताना त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांची नावे मात्र घेतली नाहीत.
हुकूमशाहाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, मनोहर लाल खट्टर, रमण सिंह, वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान या सर्व भाजपच्या नेत्यांचे राजकारण संपविले. त्यांना त्यांनी निपटवून टाकले, असे केजरीवाल म्हणाले. परंतु राहुल गांधींचे राजकारण आणि शरद पवारांचे राजकारण मोदींनी संपविले किंवा ते संपविणार आहेत, असे केजरीवाल म्हणाले नाहीत. नेमके हेच केजरीवालांच्या भाषणातले “बिटवीन द लाईन्स आहे” राहुल गांधी हे भाजपचे “स्टार प्रचारक” आहेत आणि शरद पवार हे भाजपचे “स्ट्रॅटेजिक प्रचारक” आहेत असे काही राजकीय विश्लेषण बोलतच असतात. अरविंद केजरीवालांनी आपल्या आजच्या भाषणात हे फक्त “बिटवीन द लाईन्स” सांगितले.
पण त्यापलीकडे ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे स्टालिन, तेजस्वी यादव वगैरे नेत्यांना त्यांनी जे तुरुंगात “घातले” ती प्रत्यक्षात त्यांनी मोदींची ही पुढची असाइनमेंट असल्याचे टाकल्याचे निदर्शक आहे किंबहुना मोदींचा पुढचा सेट झालेला अजेंडाच केजरीवालांनी जाहीर करून टाकला. कारण मराठीत जी म्हण आहे, “चोरांच्या वाटा चोराला ठाऊक असतात”, तीच केजरीवाल्यांनी आपल्या तोंडून बोलून प्रत्ययाला आणून दिली. त्यामुळेच ते ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, स्टालिन वगैरे नेत्यांचे “भविष्य” वर्तवू शकले.
पवारांच्या मुलाखतीतले “बिटवीन द लाईन्स”
जे केजरीवालांच्या भाषणातले “बिटवीन द लाईन्स” तेच शरद पवारांच्या मुलाखतीतले “बिटवीन द लाईन्स” ठरले. शरद पवारांची मुलाखत इंडियन एक्सप्रेस मध्ये छापून आली. ती मुलाखत बारामतीतल्या मतदानाच्या आधी दिली होती, परंतु प्रत्यक्षात बारामतीतले मतदान संपल्यानंतर ती छापून आली. त्यामुळे तिचे राजकीय टाइमिंग पवारांनी ठरवल्याप्रमाणे सिद्ध झाले. यात पवारांनी उघडपणे भाजपच्या विजयाचे आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीच्या पराभवाचे भाकीत केले. त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याची पुडी सोडून दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कमकुवत होणार, प्रादेशिक पक्ष आणखी कमकुवत होणार आणि हे दोन कमकुवत एकत्र येऊन बळकट होण्याचा प्रयत्न करणार, असे पवारांचे प्रत्यक्षात “भाकीत” आहे.
बाकी पवारांची भाषा केजरीवालांसारखीच मोदी हुकूमशाह आहेत, मोदी पुतीन आहेत, मोदींनी देशातल्या लोकशाहीची वाट लावली, अशीच मोदींना ठोकणारी आहे, पण प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाची पुडी सोडून पवारांनी काँग्रेसच्या पराभवाचे आणि पर्यायाने प्रादेशिक पक्षांच्या पराभवाचे “भाकीत” वर्तविले आहे.
या सगळ्याचा स्पष्ट राजकीय अर्थ असा की, 4 जून 2024 रोजी मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजप विजयी होईल आणि राहुल गांधींच्या (न)नेतृत्वाखालच्या इंडी आघाडीचा पराभव होऊन राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत!! नेमके हेच केजरीवाल आणि पवारांच्या एका माळेचे मणी बनल्याचे निदर्शक आहे आणि त्या दोघांनी मिळून राहुल गांधींच्या पायाखालची फळी अप्रत्यक्षपणे ओढली आहे!!
Kejriwal and pawar targets Modi verbally, but targets rahul Gandhi in real terms
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्यावर आरोप निश्चित; दिल्ली न्यायालयात सुनावणी
- पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने
- ठाकरे + पवार + काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मशिदींमधून फतवे; राज ठाकरेंचा गंभीर इशारा!!
- निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारलं!