• Download App
    पंजाबात तब्बल वीस हजार कोटींची वाळूचोरी – केजरीवाल यांचा चन्नींवर आरोप । Kejariwal targets Punjab Govt.

    पंजाबात तब्बल वीस हजार कोटींची वाळूचोरी – केजरीवाल यांचा चन्नींवर आरोप

    वृत्तसंस्था

    अमृतसर : पंजाबमध्ये आप सत्तेवर आल्यास अवैध वाळूउपसा थांबेल. वाळूचोरीचा पैसा राजकारण्यांच्या खिशात जाणार नाही, तर महिलांना कमाई होईल. त्यामुळेच पंजाबमधील नेते मला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याविरुद्ध वाळूचोरीचे गंभीर आरोप आहेत. २० हजार कोटी रुपयांच्या वाळूची चोरी झाली आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. Kejariwal targets Punjab Govt.



    याप्रकरणी चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) सादर केला जावा अशी मागणीही त्यांनी केली. चन्नी यांच्या चमकौर साहिब मतदारसंघात वाळूची अवैध खाण सापडल्याचे गेल्या काही दिवसांत मला आढळून आले. त्यांच्याच मतदारसंघात असे घडत असेल तर त्यांना कल्पना नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या अवैध खाणीचे मालक ते आहेत की त्यांची भागीदारी आहे की ते इतरांना अभय देत आहेत हे पंजाबला माहीत करून घ्यायचे आहे. अनेक मंत्री आणि आमदारांचे वाळूचोरीला अभय असल्याचे (आधीचे मुख्यमंत्री) कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच म्हटले होते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

    Kejariwal targets Punjab Govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट