विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या विरोधातआघाडी भक्कम करण्यासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत.KCR Rao’s strategy to end the Congress as an opposition in the name of Modi’s opposition
मोदी विरोधाचे नाव असले तरी देशाच्या राजकीय पटलावरून कॉँग्रेसचे विरोधक म्हणून असलेले स्थान हिरावून घेणे हिच राव यांच्यासह केजरीवाल, ममता बॅनर्जी यांची रणनिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राव यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या विरोधात आघाडी मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. पण त्यामध्ये काँग्रेसला वगळायचे आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच केसीआर यांची भेट घेतली होती. भाजपेतर मुख्यमंत्र्यांना भेटून आघाडी भक्कम करण्याचा के. चंद्रशेखर राव प्रयत्न करीत आहेत. या रणनीतीचा भाग म्हणून मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गेल्या सात वर्षांपासून केजरीवाल यांची दिल्लीत सत्ता आहे. चंद्रशेखर राव शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशीही चर्चा करणार आहेत. काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी झाले.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही राकेश टिकैत व शेतकरी नेत्यांनी मोदी सरकारच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचारात गुंतलेले असल्याने केसीआर यांच्याशी भेट होणार नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या विरोधात भक्कम आघाडी उभी करण्याचा मुख्यमंत्री राव प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते भाजपेतर मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेपासून त्यांनी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला ठेवले आहे. यामुळे काँग्रेस वगळता तिसरी आघाडी स्थापन करण्याचा उद्देश केजरीवाल भेटीमागे असल्याचे स्पष्ट आहे.
KCR Rao’s strategy to end the Congress as an opposition in the name of Modi’s opposition
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक
- Power of Indian flag : पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणा – वाहनांवर तिरंगा- अन् सुरक्षित पडले युक्रेनमधून बाहेर – म्हणाले पाक सरकार खोटारडे – आम्ही पाकिस्तानी आहोत हेच आमचे दुर्दैव …
- पोलींसांची नावे ऐकताच थरथर कापणारे, मुतणारे पाहिलेत, आता धाक उरला नाही, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
- हरियाणातील निवडणुकीचा व्हिडीओ दाखवित अखिलेश यादव यांची कुंडातील निवडणूक रद्द करण्याची मागणी, राजा भय्या संतापले
- RUSSIA-UKRAINE WAR : युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक