• Download App
    Kashmir leaders played a game overwriting later to prime ministersभारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच "बुद्धिमत्तांना" लागली भारत - पाकिस्तान शांततेची तहान!!

    भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!

    Kashmir

    नाशिक : भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!, हे राजकीय वास्तव समोर आले.Kashmir leaders played a game overwriting later to prime ministers

    – सिंधू करार स्थगित

    भारताने दहशतवादी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी सिंधू करार स्थगित केला. त्यापाठोपाठ भारत भूमीवर असलेल्या वेगवेगळ्या नद्यांच्या आणि धरणांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्यामुळे भारताच्या हक्काचे पाणी भारतातच अडवले जाणार याची खात्री झाली. त्याचबरोबर भारताने स्वतःच्या सोयीनुसार वेगवेगळ्या धरणांचे पाणी अडवले आणि सोडले त्यामुळे पाकिस्तानात कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ असले प्रकार घडले. पाकिस्तान मध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली. पाकिस्तानचे पीक नियोजन बोंबलले. पाकिस्तानी मंत्र्यांनी भारताला वेगवेगळ्या धमक्या दिल्या. पण तरीही भारतातले मोदी सरकार बधले नाही. मोदी सरकारने सिंधू करार पुन्हा बहाल करायला नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानचा घसा कोरडा पडला. पाकिस्तानने ट्रॅक वन डिप्लोमसी, ट्रॅक टू डिप्लोमसी असले डिप्लोमसी चे खेळ करून पाहिले‌. पण तरीही मोदी सरकार बधले नाहीच.



    काश्मिरी घराण्यांचाच भरणा

    म्हणून मग भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शांतीवादी बुद्धिमत्तांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शांततेची तहान लागली. पण ही शांततेची तहान एकतर्फी वाटू नये, यासाठी या बुद्धिमत्तांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना अधिकृत चर्चा आणि वाटाघाटी सुरू करायचे आवाहन करणारे पत्र लिहिले. पण हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये जम्मू काश्मीर मधल्या घराणेशाहींच्या नेत्यांचाच भरणा असल्याचे राजकीय सत्य उघड्यावर आले.

    यासंदर्भात R AW चे माजी प्रमुख अमरजीत सिंग दुलत यांनी वक्तव्य केले. त्यामुळे ते स्वतः आणि भारतातले बुद्धिमंत “एक्स्पोज” झाले.

    – दुलत यांचे वक्तव्य

    भारत आणि पाकिस्तानमधील १०० हून अधिक प्रतिष्ठित नागरिकांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना ‘शांतता, सामान्य स्थिती आणि संवाद पुनर्स्थापित करण्याबाबत’ लिहिलेल्या पत्रावर, त्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक – ‘रॉ’ (R&AW) चे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलत म्हणाले, “हा पुढाकार ओ. पी. शाह यांनी घेतला आहे, जे अनेक वर्षांपासून भारत-पाकिस्तान शांततेसाठी काम करत आहेत. आम्हाला वाटले की हे पत्र काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकेल; या पत्रावर केवळ काश्मिरी किंवा भारतीयांनीच स्वाक्षरी केली आहे असे नाही, तर त्यात पाकिस्तान्यांचाही समावेश आहे.‌ मला डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि जेव्हा ओ. पी. शाह यांनी मला फोन करून सांगितले की डॉ. फारुख या पत्रावर स्वाक्षरी करत आहेत, तेव्हा मी म्हणालो की मला स्वाक्षरी करण्यात काहीच अडचण नाही; मी त्यावर स्वाक्षरी केली. ते बऱ्याच काळापासून सांगत आहेत, की आपल्याला शांतता हवी आहे. पण मला नाही वाटत की या पत्राचा खूप मोठा परिणाम होईल. सध्या जी भावना निर्माण झाली आहे, तिला केवळ बळकटी देण्याचा हा प्रयत्न आहे. कारण जेव्हा संघाचे नेते पाकिस्तानशी चर्चा करण्याबद्दल बोलतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो, की कुठेतरी काही लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे, जर ते तसा विचार करत असतील, तर आपणही तसा विचार केला पाहिजे. मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. संपूर्ण काश्मिरी नेतृत्वाने या पत्रासाठी योगदान दिले आहे.”

    ओ‌. पी. शाह आणि अमरजीत सिंग दुलत हे दोघेही काँग्रेसी विचारसरणीचे पाईक मानले जातात. त्यामुळे त्यांनी पॉलिटिकल टायमिंग साधून राजकीय चतुराईने दोन पंतप्रधानांना पत्र लिहायचा आव आणला. प्रत्यक्षात केंद्रातल्या मोदी सरकारने पाकिस्तानची पुरती कोंडी केल्यामुळे त्या देशाचे सरकार अडचणीत आल्याचे या बुद्धिमत्तांना सहन झाले नाही, हेच सत्य या पत्रातून बाहेर आले.

    Kashmir leaders played a game overwriting later to prime ministers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि पुढे करणार काय??, वाचा तपशीलवार!!

    Asaram Bapu Bail : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आसारामला आम्ही जामीन देणार नाही; जीवाला धोका असेल, तरच विचार करू; राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले

    Ethanol Allocation : इथेनॉल वाटपात बदल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सरकारने सांगितले- 20% इथेनॉल मिश्रणाचे धोरण बदलणार नाही