• Download App
    काश्मीरचा आमचा भाग होता, आहे आणि कायम राहील : UNHRCमध्ये भारताची पाकिस्तानवर टीका|Kashmir always be our part India's criticism of Pakistan at UNHRC

    काश्मीरचा आमचा भाग होता, आहे आणि कायम राहील : UNHRCमध्ये भारताची पाकिस्तानवर टीका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी पुन्हा एकदा भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने त्यांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय मुत्सद्दी सीमा पुजानी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची खरडपट्टी काढत त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे.Kashmir always be our part India’s criticism of Pakistan at UNHRC

    सीमा पुजानी म्हणाल्या की, आज पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक मुक्तपणे जगू शकत नाही किंवा धर्म पाळू शकत नाही. जगभरातील हजारो नागरिकांच्या मृत्यूला पाकिस्तानची धोरणे थेट जबाबदार आहेत. पाकिस्तानच्या स्वत:च्या चौकशी आयोगाला गेल्या दशकात जबरदस्तीने बेपत्ता झाल्याच्या 8,463 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या क्रूर धोरणाचा फटका बलुच जनतेला बसला आहे. विद्यार्थी, डॉक्टर, अभियंते, शिक्षक आणि समाजाचे नेते वारंवार गायब होतात.



    ‘पाकिस्तान पसरवत आहे अपप्रचार’

    काश्मीरबाबत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पुजानी म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण भाग भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील. शेजारी देश नेहमीच भारताविरोधात अपप्रचार करण्यात गुंतला आहे. हे पाकिस्तानच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचे लक्षण आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने भारतीय भूभागावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.

    Kashmir always be our part India’s criticism of Pakistan at UNHRC

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!