विशेष प्रतिनिधी
काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, अहिल्याबाई होळकर या सर्व मराठी संदर्भांचे स्मरण केले. Kashi vishwanath corridor; PM Modi remembered shivaji maharaj
काशी विश्वनाथ धाम उध्वस्त करायला औरंगजेब आला. त्याने तलवारीच्या जोरावर इथली सभ्यता – संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने एक प्रचंड ज्वाला उभी राहिली. त्यांनी काशी विश्वनाथकडून प्रेरणा घेत स्वराज्याची स्थापना केली. धर्म रक्षण केले. राजा सुहेलदेव यांनी देखील मुस्लिम आक्रमकांना इथूनच परतवून लावले, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली.
विरासत आणि विकास हे नव्या भारताचे वैशिष्ट्य आहे असे सांगत त्यांनी देशातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आळंदी आणि देहू पासून श्री विठ्ठलाच्या पंढरपूर पर्यंत पालखी मार्गांचा विकास होतो आहे, याचा आवर्जून उल्लेख केला. त्याच वेळी त्यांनी इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ धाम मंदिर निर्माणत केलेल्य योगदानाचे ही विशेष स्मरण केले. भारतीय संस्कृती वरच्या आक्रमकांना कठोर प्रत्युत्तर देणारे राजे इथून प्रेरणा घेऊन गेले, तर संतांनी सांस्कृतिक उत्थान केले त्यांच्या प्रेरणा देखील काशी विश्वनाथ धामतच आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले. काशी विश्वनाथ धामाने संपूर्ण भारताला पूर्व – पश्चिम – उत्तर – दक्षिण असे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जोडून ठेवले आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
Kashi vishwanath corridor; PM Modi remembered shivaji maharaj
महत्त्वाच्या बातम्या
- काशी विश्वनाथ धाम लोकार्पण : हजारो वर्षांचे स्वप्न साकार झाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन
- काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पवृष्टीने केला श्रमिकांचा सत्कार-सन्मान!!
- Watch : पीएम मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या श्रमिकांची घेतली भेट, फुलांचा वर्षाव करत केला सन्मान, एकत्र बसून काढले फोटो
- काशी विश्वनाथ धाम : विकासानंतर काशीत काय-काय झाले बदल? भाविकांना- प्रवाशांना काय सुविधा मिळणार.. वाचा टॉप १० मुद्दे