• Download App
    काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन झाले; "हिंदू की हिंदुत्ववादी" शाब्दिक खेळ करत काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल!! |Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing "Hindu or pro-Hindu" word game !!

    काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन झाले; “हिंदू की हिंदुत्ववादी” शाब्दिक खेळ करत काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन भव्य समारंभात संपन्न झाले. देशभर त्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात देखील मोदींचे भाषण सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते आहे.Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing “Hindu or pro-Hindu” word game !!

    हा उद्घाटन समारंभ दुपारी संपन्न झाला. त्यानंतर काँग्रेसने त्या समारंभाच्या जाहिरातींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये काँग्रेसने, “हिंदू की हिंदुत्ववादी? तुम्हीच निवड करा”, असे म्हणत मोदींना घेरले आहे.



    मोदी सरकारने आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या फ्रंट पेज जाहिराती सर्व वर्तमानपत्रांना दिल्या आहेत. यामध्ये काशी विश्वनाथ धाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रामुख्याने वापरण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने हिंदू आणि हिंदुत्ववादी या शब्दांवर खेळ करत मोदींना घेरले आहे.

    राहुल गांधी यांनी कालच जयपूरमधल्या भाषणात मी हिंदू आहे. पण हिंदुत्ववादी नाही. हिंदुत्ववादी सत्तापिपासू असतात, तर हिंदू सत्यवादी असतो हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्तेशी देणे घेणे असते. सत्याशी नाही, असा हल्लाबोल केला होता. तोच मुद्दा उचलून काँग्रेसने काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या जाहिरातींच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन “हिंदू या हिंदुत्ववादी?” असे शब्दांचे खेळ केले आहेत.

    Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing “Hindu or pro-Hindu” word game !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??