• Download App
    ‘मेहनत की कमाई’ :कार्तिक आर्यनने केला Lamborghini ला चरणस्पर्श ! Kartik Aaryan touches his new car Lamborghini Urus' 'feet', watch video

    ‘मेहनत की कमाई’ : कार्तिक आर्यनने केला Lamborghini ला चरणस्पर्श !

    • अलीकडेच कार्तिक आर्यनने नवीन लुम्बोर्गिनी कार खरेदी केली असून, त्याच्या या गाडीची किंमत तब्बल साडेचार कोटी रुपये इतकी आहे.
    • कार्तिकची ही नही Lamborghini Urus पाहून चाहत्यानी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.
    • या कार व्यतिरिक्त त्याच्याकडे BMW 5 Series आणि MINI Cooper या कारही आहेत.

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : जीवनात एखादी वस्तू किंबहुना एखादी महागडी वस्तू आपल्याकडे असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. वस्तूचं स्वरुप बदलतं, पण हे स्वप्न मात्र कायम असतं. असंच स्वप्न पाहिलं होतं, अभिनेता कार्तिक आर्यन यानं. अर्थात त्याचं हे स्वप्नही साकार झालं. अलिकडेच कार्तिकनं कोट्यवधी रुपयांची लुम्बोर्गिनी कार खरेदी केली . अन् या कारच्या तो पाया पडत होता.Kartik Aaryan touches his new car Lamborghini Urus’ ‘feet’, watch video

     

     

    त्यानं आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. त्यामुळं त्यानं केलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांना अप्रूप वाटतं .मग काय चाहत्यांनी त्याचा हा कारच्या पाया पडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला.

     

    अलिकडेच ही महागडी गाडी घेऊन तो आपल्या मित्राकडे जात होता. त्यावेळी त्यानं कारमध्ये बसण्यापूर्वी तिच्या पाया पडला. ज्या प्रमाणे आपण एखाद्या मोठ्या माणसाचे आशिर्वाद घेतो अगदी त्याच भावनेनं तो आपल्या कारचे आशिर्वाद घेत होता. त्यावेळी सभोवताली असलेल्या चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ काढले.

     

     

    “इतक्या महागड्या वस्तूंची मला सवय नाही” अशा आशयाची कॅप्शन देत त्यानं देखील आपल्या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    कार्तिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर येत्या काळात तो अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

    Kartik Aaryan touches his new car Lamborghini Urus’ ‘feet’, watch video

     

     

     

    Related posts

    मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही