विशेष प्रतिनिधी
बेंगलोर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा तर ओलांडलाच आहे काँग्रेस सत्ता 117 जागांवर आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले असून निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी देखील जाहीर केली आहे यात काँग्रेस 43.7% भाजप 36.6% जेडीएस 11.2% मते मिळाली आहेत.Karnataka elections Results, Congress way ahead in vote percentage of BJP
याचा अर्थ मतांच्या टक्केवारीत काँग्रेस भाजपला फार पिछाडीवर टाकून पुढे सरकली आहे. भाजपने आपली लढाई मतांची टक्केवारी वाढविण्यावर भर देणारी ठेवली होती. मात्र या लढाईत भाजपला आकड्यांच्या हिशेबात अपयश आल्याचे दिसत आहे काँग्रेस आणि भाजप यांच्यात तब्बल 7% मतांचे अंतर आता भाजप तोडणे जवळपास अशक्य असल्याचे दिसत आहे. भाजप डबल डिजिट मध्येच पुढे मागे सरकताना दिसत आहे. त्याच वेळी काँग्रेसने मात्र बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर दिल्लीपासून मंगलोर पर्यंत काँग्रेसच्या सर्व मुख्यालयांमध्ये जल्लोष सुरू आहे.
भाजपने आपल्या लढाईचा सर्व भर मतदानाची टक्केवारी आपल्या पक्षाकडे वाढविण्यावर ठेवला होता परंतु प्रत्यक्षात भाजपला साधारण 1 % मतांची वाढ मिळवता आली. त्या पलीकडे मात्र भाजपला झेप घेता आली नाही. असे आकडेवारीतून दिसते. त्या उलट काँग्रेसने आपली मतांची टक्केवारी 40% च्या पुढे तर नेलीच पण ती जवळपास 3.5 % ने वाढवून बहुमताचा आकडाही पार केला.
सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांच्या घरांसमोर काँग्रेसने प्रचंड जल्लोष चालविला आहे. त्याच वेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा देखील तीव्र होत चालली आहे. त्यामुळे अर्थातच ट्रम्प कार्ड काँग्रेस श्रेष्ठींच्या हातात गेले आहे काँग्रेस श्रेष्ठ ठरवतील तोच मुख्यमंत्री हे सूत्र कर्नाटकात लगेच लागू होईल.
मात्र हे सूत्र लागू झाल्यानंतर बहुमतातली काँग्रेस एकसंध राहील का??, याविषयी शंका निर्माण झाल्याने काँग्रेस सावध पावले टाकत सर्व आमदारांना बंगलोरला एकत्र बोलवण्याची मशक्कत करत आहे. त्यासाठी काँग्रेसने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून जागोजागी खाजगी विमाने, हेलिकॉप्टर तैनात केली आहेत.
Karnataka elections Results, Congress way ahead in vote percentage of BJP
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : जर चित्रपट इतर राज्यांमध्ये शांततेने चालू शकतो, तर बंगालमध्ये बंदी का? – सुप्रीम कोर्टाचा सवाल!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे खूनप्रकरणी गुन्हा, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप
- परमबीर सिंह यांचं निलंबन राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- ‘’…म्हणून ‘गिरा तो भी टांग उपर’ ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचे धोरण’’ आशिष शेलारांनी साधला निशाणा!