• Download App
    Karnataka Election Result : काँग्रेसला बहुमत अन् भाजपाच्या अपयशावर कर्नाटकातील दोन्ही पक्षातील दिग्गजांच्या प्रतिक्रिया Karnataka Election Result Reactions of leaders of both parties in Karnataka on Congress victory and BJPs failure

    Karnataka Election Result : काँग्रेसला बहुमत अन् भाजपाच्या अपयशावर कर्नाटकातील दोन्ही पक्षातील दिग्गजांच्या प्रतिक्रिया

    जाणून घ्या, बोम्मईंपासून ते शिवकुमार पर्यंत कोण काय म्हणालं

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आता कर्नाटकात बहुमताचं सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस कर्नाटकात १३० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला केवळ त्याच्या निम्म्या जागांवर आघाडी आहे. कर्नाटकच्या या निकालावर दोन्ही पक्षांच्या दिग्गजांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. Karnataka Election Result Reactions of leaders of both parties in Karnataka on Congress victory and BJPs failure

    भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा म्हणाले, ‘’भाजपासाठी विजय आणि पराभव नवा नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी या निकालानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. पक्षाच्या पराभवावर आम्ही आत्मचिंतन करू. मी आदरपूर्वक हा पराभव स्वीकारतो.’’

    कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता – सिद्धरामय्या

    ‘’कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही १३० जागांचा आकडा पार करू, हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता, कारण ते भाजपा सरकारला कंटाळले होते. भाजपाने ऑपरेशन ‘लोटस’वर भरपूर पैसा खर्च केला. पण राहुल गांधींच्या पदयात्रेची पक्षाला प्रचंड मदत झाली.’’ असं काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

    आम्ही हा निकाल स्वीकारतो – राजीव चंद्रशेखर

    भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. आम्ही मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करतो. आम्ही हा निकाल स्वीकारतो. आम्ही राज्याच्या विकासासाठी, लोकांसाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून समर्थपणे काम करू. या निवडणुकीत नेमकं काय चुकलं, यावर आम्ही काही काळानंतर बोलू शकू.”, असं राजीव चंद्रशेखर म्हणाले आहेत.

    हे सामूहिक नेतृत्वाचं फळ – शिवकुमार

    “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.’’ कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यश्र शिवकुमार यांनी म्हटलं  आहे.

    ‘’भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकाच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री करायला हवं.’’ असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा मुलगा यथिंद्र सिद्धारमय्या म्हणाले आहेत.

    Karnataka Election Result Reactions of leaders of both parties in Karnataka on Congress victory and BJPs failure

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!