• Download App
    Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, तर भाजपाने मान्य केला जनादेश! Karnataka Election Result Congress moves towards majority in Karnataka while BJP accepts mandate

    Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, तर भाजपाने मान्य केला जनादेश!

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या मतमोजणीच्या कलानुसार कर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी १०० च्या पुढे असेलाल जादुई आकडा गाठला आहे. त्याचवेळी भाजपा नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही जनादेश स्वीकारला आहे. Karnataka Election Result Congress moves towards majority in Karnataka while BJP accepts mandate

    जनेचा कौल मान्य करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “आम्ही आमचे लक्ष्य गाठू शकलो नाही. संपूर्ण निकाल आल्यानंतर, आम्ही तपशीलवार विश्लेषण करू आणि राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून विविध पातळ्यांवर आपण कुठे  कमी  पडलो याचे चिंतन करू. आम्ही आमच्या उणिवा शोधू आणि त्या सुधारून लोकसभा निवडणुकीत परत येऊ.’’

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि या विजयाचे नायक डीके मीडियासमोर आले तेव्हा ते भावूक झाले.  डीके शिवकुमार म्हणाले की, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. हा सामूहिक नेतृत्वाचा विजय आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना कर्नाटकचा गड त्यांच्या ताब्यात देईन, असे आश्वासन दिले होते.

    यावेळीही ते त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ कनकपुरा येथून निवडणूक लढवत होते. पारंपारिक जागा यासाठी कारण ते येथून आठ वेळा आमदार झाले आहेत. कनकपुरा येथे ते भाजपा सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक यांच्या विरोधात होते. ज्यांचा त्यांनी पराभव केला आहे.

    मतमोजणीत कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर –

    काँग्रेस-  १३६

    भाजपा – ६४

    जेडीएस – २०

    इतर – ४

    Karnataka Election Result Congress moves towards majority in Karnataka while BJP accepts mandate

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!