• Download App
    हिजाब वादामागे इस्लामिक संघटना, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाची चिथावणी असल्याचा कर्नाटकाच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप|Karnataka Education Minister Accuses Islamic Organization, Campus Front of India of Behind Hijab Dispute

    हिजाब वादामागे इस्लामिक संघटना, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाची चिथावणी असल्याचा कर्नाटकाच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू :कर्नाटकमधील हिजाब वादामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या इस्लामिक संघटनेची शाखा असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात आहे. याचे पुरावेही आम्हाला मिळाले आहेत. त्या संघटनेच्या चिथावणीचाच हा परिणाम आहे की, काही मुलींनी हिजाबसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. यापूर्वी अशी मागणी कधीही झाली नव्हती. अचानक गदारोळ झाला असल्यचा आरोप कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी केला आहे.Karnataka Education Minister Accuses Islamic Organization, Campus Front of India of Behind Hijab Dispute

    नागेश म्हणाले, या संपूर्ण प्रकरणामध्ये अप्रत्यक्ष हात आहे. हिजाबचा वाद भडकावण्यामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेच्या राजकीय शाखेचे षड्यंत्र आहे. राज्य पोलीस आणि इतर यंत्रणांकडून आम्हाला याचे पुरावे मिळाले आहेत. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अंतर्गत चालते.



    महिनाभरापासून हा वाद सुरू होता. हा गोंधळ अचानक झालेला नाही. काही मुली हिजाबची मागणी करू लागतात. असे यापूर्वी कधीही घडलेले नाही. हे संपूर्ण प्रकरण भडकावण्यामागे काही लोकांचा हात आहे. आम्ही दंगल अजिबात होऊ देणार नाही. संपूर्ण प्रकरण नियंत्रणात आहे. आम्ही 3 दिवस शाळा बंद ठेवल्या आहेत. ‘षडयंत्र’ कितीही मोठे असले तरी आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. प्रशासन सतर्क आहे.

    कर्नाटक शिक्षण कायदा 2013 आणि 2018 शैक्षणिक संस्थेला स्वत:चा ड्रेस कोड सेट करण्याचा अधिकार देतो. शाळांबाबत आमचे धोरण स्पष्ट आहे. शाळेत आल्यास त्या शैक्षणिक संस्थेचा गणवेश घालावा लागेल, अन्यथा तुम्हाला पर्याय शोधावा लागेल. उर्वरित प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. निर्णय येऊ द्या.

    अल्ला हू अकबर’ किंवा ‘जय श्री राम’च्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. हिजाबच्या मुद्द्यावर सविस्तर चौकशी होणार, असे आम्ही सांगितले आहे. याप्रकरणी कटाच्या तळापर्यंत जाणार आहोत.

    Karnataka Education Minister Accuses Islamic Organization, Campus Front of India of Behind Hijab Dispute

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र