• Download App
    Karnataka कर्नाटकात काँग्रेस सरकारचे फक्त मुस्लिमांना सरकारी घर योजनांमध्ये 15 % पर्यंत वाढीव आरक्षण!!

    कर्नाटकात काँग्रेस सरकारचे फक्त मुस्लिमांना सरकारी घर योजनांमध्ये 15 % पर्यंत वाढीव आरक्षण!!

    विशेष प्रतिनिधी

    बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिमांचे तुष्टीकरण चालूच ठेवले आहे. भारतीय राज्यघटनेत कुठल्याही स्वरूपाचे धार्मिक आरक्षण नाकारले असताना कर्नाटक सरकारने आधी मुस्लिमांना सरकारी कंत्राटांमध्ये 5 % आरक्षण दिले. आता त्या पुढे जाऊन सरकारी गृह योजनांमध्ये 15 % पर्यंत वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून चौफेर टीका झाल्यानंतरही सरकारने निर्णय बदलला नाही.

    कर्नाटकात राज्य सरकारच्या आश्रय, बसवण्णा आणि डॉ. आंबेडकर अशा वेगवेगळ्या सरकारी गृह बांधणी योजना आहेत. यामध्ये वेगवेगळ्या समुदायांना आरक्षण आहे. त्यामध्ये सर्व अल्पसंख्यांक समुदायांना मिळून 10 % टक्के आरक्षण आधीच दिले आहे. यामध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन या समुदायांचा समावेश आहे, पण त्यामध्ये कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारने बदल करून फक्त मुस्लिमांना आणखी 5 % म्हणजे एकूण 15 % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

    त्या निर्णयातील मेख अशी की बाकी कुठल्याही अल्पसंख्यांक समुदायांना 15 % आरक्षणाचा लाभ मिळणार नसून तो फक्त मुस्लिम समुदायाला मिळणार आहे. कर्नाटक मध्ये झालेल्या सर्वेक्षणात मुस्लिम समुदायात बेघरांची संख्या अधिक आढळल्याने सरकारने असा निर्णय घेतल्याचा दावा कर्नाटक मधले मंत्री एच. के. पाटील यांनी केला. मात्र सरकारच्या या निर्णयावर चौफेर टीका झाली. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध अन्य समुदायांनी कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    Karnataka Cabinet approves 15% housing quota for Muslims across state

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल