वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Kargil War कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.Kargil War
त्यात चिनाब नदीकाठी राज्याचे सांप्रदायिक धर्तीवर विभाजन करण्याचा प्रस्ताव होता. पत्रकार आणि लेखक अभिषेक चौधरी यांच्या ‘द बिलीव्हर्स डायलेमा: वाजपेयी अँड द हिंदू राईटस् पाथ टू पॉवर’ या नवीन पुस्तकात हे उघड झाले आहे. पुस्तकानुसार, वाजपेयींच्या १९९९ च्या पाकिस्तान भेटीनंतर आणि लाहोर घोषणापत्रानंतर, माजी पाकिस्तानी राजनयिक नियाज नाईक आणि भारताचे मध्यस्थ आरके मिश्रा यांच्यात दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ५ दिवसांची गुप्त बैठक झाली. या दरम्यान दोघांनीही काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.Kargil War
चिनाब सूत्र नेमके काय होते?
या बैठकांमध्ये वाजपेयींनी दोघांनाही ‘नवीन विचारसरणी’ स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर नाईक आणि मिश्रा यांनी मिळून चिनाब सूत्र तयार केले. या अंतर्गत, चिनाब नदीच्या पश्चिमेकडील मुस्लिम बहुल जिल्हे पाकिस्तानला द्यायचे होते. तर पूर्वेकडील हिंदू बहुल जिल्हे भारतातच ठेवायचे होते.
कोणते पर्याय नाकारले गेले?
पुस्तकात असे म्हटले आहे की या सूत्रापूर्वी, नियंत्रण रेषा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून स्वीकारणे (नाईक यांनी नाकारले), काश्मीरला स्वायत्तता देणे (नाईक यांनी नाकारले), काश्मीरला स्वातंत्र्य देणे (मिश्रांनी नाकारले) आणि प्रदेशवार जनमत चाचणी (मिश्रांनी नाकारले) असे अनेक पर्यायांवरही चर्चा झाली.
वाजपेयींनी शरीफ यांना संदेश पाठवला
१ एप्रिल १९९९ रोजी इस्लामाबादला परतण्यापूर्वी नाईक वाजपेयींना भेटले. उन्हाळ्यात घुसखोरी आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबवण्यासाठी वाजपेयींनी त्यांच्यामार्फत शरीफ यांना संदेश पाठवला. परंतु, मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय गुप्तचर संस्था आणि गस्त घालणाऱ्यांना नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी हालचालींमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आले.
Kargil War: Vajpayee-Nawaz Secret Kashmir Talks
महत्वाच्या बातम्या
- “पवार संस्कारितां”ची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!
- CAG : कॅगचा ठपका: शासनाच्या योजनांत 13 हजार कोटींच्या अनुदानाचा हिशेब नाही
- शिंदे + अजितदादांच्या मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे ठाकरे + शशिकांत शिंदेंनी साधली फडणवीसांना घेरायची संधी; पण “सफाई”ची संधी फडणवीस कधी साधणार??
- जागतिक शांतीसाठी ‘हिंदू प्रारूप’ विकसित करणार; संघाच्या प्रांतिक समन्वय बैठकीत शताब्दी वर्षाचे नियोजन