विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘मोदीजी, तुम्ही तुमची संसाधने, स्नायू, फुफ्फुसांची ताकद निवडणुका जिंकण्यासाठी वापरत आहात. मात्र, हीच ताकद,तडफ कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, आपल्या लोकांसाठी का वापरत नाहीत,’ असा खरमरीत सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटद्वारे केला आहे.Kapil sibbal lashes on PM Narendra Modi
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, पंतप्रधान केंद्रातील जबाबदारीकडे दुर्लक्ष करून पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेत असल्यावरून काँग्रेसने त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. ट्विटमध्ये सिब्बल यांनी म्हटले आहे,
की कोरोनाच्या साथीत लोक मृत्यमुखी पडत आहेत. प्रचारसभा ठीक आहेत.विजयही दिव्य आहेत. मात्र, तुम्ही ज्या लढाया लढत आहात, त्या माझ्या नाहीत, असे नागरिक मोदींना म्हणत आहेत.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असताना निवडणुकीतील प्रचारसभांवरून भाजपवर टीका होत आहे. पक्षाने नुकताच मोठ्या सभा रद्द करत छोट्या सभांचा निर्णय घेतला.
Kapil sibbal lashes on PM Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ
- बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची शक्यता; आज सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदान
- अदर पूनावाला यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार
- कोरोना रुग्णांसाठी मशिदीमध्ये उभारले कोविड सेंटर ; गुजरातमधील वडोदरात सामाजिक बांधिलकी जपली
- खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण