• Download App
    कॉँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणत कपील सिब्बल यांचे पुन्हा राहूल गांधींवर शरसंधान|Kapil Sibal says Congress needs reforms, otherwise your bad days will begin

    कॉँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणत कपील सिब्बल यांचे पुन्हा राहूल गांधींवर शरसंधान

    कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांकडून शरसंधान सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकत आहे आणि पक्षाच्या लीडरशीपला आता ऐकावे लागेल, असे म्हटले आहे.Kapil Sibal says Congress needs reforms, otherwise your bad days will begin


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांकडून शरसंधान सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकत आहे आणि पक्षाच्या लीडरशीपला आता ऐकावे लागेल, असे म्हटले आहे.

    जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसºयाच दिवसानंतर पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. कपिल सिब्बल यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा कॉँग्रेसवर शरसंधान केले आहे.



    ते म्हणाले, भाजपमध्ये जाण्याचे पाऊल आपण उचलणार नाही. हे त्याच्या मृत्यूनंतरच होऊ शकते.पण, जर कॉंग्रेसचे नेतृत्व त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगत असेल तर ते त्याबद्दल विचार करू शकतात, परंतु ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत.

    सिब्बल म्हणाले, जितिन प्रसाद सारखी व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करेल हे समजण्याच्या बाहेर आहे. जर मुद्द्यांचे समाधान होऊनही कुणाला वाटत असेल की, काहीच मिळत नसेल तर तो निघून जाईल. जितिन यांच्या जवळही पक्ष सोडण्याची कारणे असू शकतात. यासाठी मी त्यांना चुकीचे नाही ठरवू शकत पण ते ज्या कारणासाठी भाजपमध्ये गेले आहे त्याला मी दोष देत आहे.

    मला विश्वास आहे की, लीडरशीपला समस्यांविषयी माहिती आहे आणि आशा आहे की ते ऐकतील. कारण न ऐकता काहीच चालू शकत नाही. कोणतेही कॉरपोरेट स्ट्रक्चर न ऐकल्याचे सर्वाइव्ह करु शकत नाही. राजकारणातही असे नाही. जर तुम्ही ऐकले नाही तर तुमचे वाईट दिवस सुरू होतील, असेही सिब्बलयांनी म्हटले आहे.

    सिब्बल काँग्रेसच्या 23 सीनियर लीडर्समध्ये सामिल आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षामध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. काँग्रेसचे असंतुष्ट जी23 मधून अजून कुणी भाजपमध्ये प्रवेश करेल का असा अंदाच व्यक्त केला जात आहे.

    Kapil Sibal says Congress needs reforms, otherwise your bad days will begin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी