• Download App
    कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश, प्रशांत किशोर यांची रणनिती|Kanhaiyakumar to join Congress, Prashant Kishor's strategy

    कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश, प्रशांत किशोर यांची रणनिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉँग्रेसमधील नेत्यांवर आता वरिष्ठ नेतृत्वाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील तरुणांना पक्षात आणण्याची रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली आहे. जेएनयूचा विद्यार्थी नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता कन्हैैयाकुमार कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.Kanhaiyakumar to join Congress, Prashant Kishor’s strategy

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रशांत किशोर यांची कन्हैैयाकुमार याने भेट घेतली आहे. यामुळे तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डाव्या पक्षात राहून कन्हैय्या कुमारचा अपेक्षाभंग झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशांत किशोर यांची भेट घेतली याचा अर्थ कन्हैय्या कुमार काँग्रेसची वाट धरू शकतो.



    काँग्रेस पक्षातील जुन्या-जाणत्या नेत्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता युवकांना प्राधान्य आणि संधी दिली पाहिजे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
    गेल्या दीड वषार्पासून कन्हैय्या कुमार राजकारणात कमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे.

    मात्र, कन्हैय्या कुमारच्या भाषण देण्याच्या शैलीचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. तसेच युवकांना संधी देण्याचा सल्ला प्रत्यक्षात आणण्यासाठी कन्हैय्या कुमारला काँग्रेसमध्ये दिला जाऊ शकतो.

    आगामी काही महिन्यांमध्ये ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आहे. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसकडूनही रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर आता काँग्रेससाठी काम करू लागले आहेत.

    Kanhaiyakumar to join Congress, Prashant Kishor’s strategy

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त