हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेवर यावेळी रंजक निवडणूक पाहायला मिळणार आहे.
विशेष प्रतिनधी
मंडी: देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. यावेळी सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळेच निवडणुकीची तारीख जवळ आल्याने राजकीय पक्षांनी आपली सर्व ताकद निवडणूक प्रचारात लावली आहे. नेत्यांमध्ये भाषणबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचा टप्पा सुरू झाला असून, या काळात आपले प्रतिस्पर्धी पक्ष आणि उमेदवारांना लक्ष्य करण्यात नेतेही चुकत नाहीत. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौतने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.Kangana Ranaut strongly criticized the Congress
मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना राणौत म्हणाल्या की, लुटमार करण्याशिवाय काँग्रेस इथे काय करत आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, मी आता राजकारणात आले आहे, मात्र तुम्ही (काँग्रेस) म्हणाला होता की तुम्ही बहिणी-मातांना 1500 रुपये द्याल, 5 लाख लोकांना रोजगार देऊ, तो रोजगार कुठे गेला? खोटी आश्वासने देऊन ते लोकांची दिशाभूल करतात का? आपण हिमाचलच्या जनतेला जागे झाले पाहिजे. आपण या आश्वासनांना बळी पडू नये. आपल्याला पंतप्रधान मोदींच्या नव्या भारतासोबत चालायचे आहे.
भाजपने प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतला मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेवर यावेळी रंजक निवडणूक पाहायला मिळणार आहे. भाजप उमेदवार कंगना रणौत यांच्या विरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह उमेदवार असणार आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा आणि हिमाचल सरकारचे मंत्री विक्रमादित्य सिंह मंडीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होती.
काँग्रेसने विक्रमादित्य सिंह यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. दिल्लीतील काँग्रेस सीईसीच्या बैठकीनंतर विक्रमादित्य सिंग यांच्या आई आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह म्हणाल्या की, यावेळी तरुण नेत्याला उभे केले पाहिजे, असे आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यामुळे विक्रमादित्य सिंग यांच्या नावावर एकमत झाले आहे. मंडी मतदारसंघातून एकाच उमेदवाराच्या नावाची चर्चा झाली असून तो उमेदवार विक्रमादित्य आहे.
Kangana Ranaut strongly criticized the Congress
महत्वाच्या बातम्या
- ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी
- पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित
- केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही
- मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??