• Download App
    कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील ड्रग्स आयातदाराला ठोकल्या पंजाबमध्ये बेड्या!! Kandla port heroin case: Drug importer beaten up in Punjab

    कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील ड्रग्स आयातदाराला ठोकल्या पंजाबमध्ये बेड्या!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गुजरात मधील कांडला बंदरातील ड्रग्सचे कनेक्‍शन पंजाबमध्ये असल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणातल्या आयातदार पंजाब मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.Kandla port heroin case: Drug importer beaten up in Punjab

    गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्‍यांबरोबर संयुक्तपणे विकसित केलेल्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी सध्या कांडला बंदर इथे उत्तराखंडमधील कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करत आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ही खेप कांडला बंदरात आली होती. 17 कंटेनर (10,318 बॅग) मधून आयात केलेल्या मालाचे एकूण वजन 394 मेट्रिक टन भरले आणि ती “जिप्सम पावडर” असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत 1,439 कोटी रुपये किंमतीचे 205.6 किलो अवैध हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मालाची सखोल तपासणी अजूनही बंदरात सुरू आहे.

    डीआरआयचे भारतभर छापे

    तपासादरम्यान, आयातदार उत्तराखंडमधील नोंदणीकृत पत्त्यावर सापडला नाही. त्यामुळे आयातदाराला पकडण्यासाठी देशभरात मोहीम झाली. आयातदाराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डीआरआयने भारतभर विविध ठिकाणी छापे घातले. ओळख टाळण्यासाठी आयातदार सारखी ठिकाणे बदलून लपून राहात होता. मात्र अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि पंजाबमधील एका लहान गावात हा आयातदार सापडला. आयातदाराने प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्यामुळे.

    ट्रान्झिट रिमांड मंजूर

    आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे, डीआरआयने या आयातदाराला एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींअंतर्गत अटक केली आणि त्याला अमृतसरच्या विशेष दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांना या आयातदाराला भुज येथील न्यायालयासमोर हजर करता यावे यासाठी न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    Kandla port heroin case: Drug importer beaten up in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू; 8 जूनपर्यंत अर्ज, मध्य प्रदेश-राजस्थानच्या जागांवर सर्वाधिक चर्चा

    PM Modi : रोजगार मेळ्यातून 51 हजार तरुणांना सरकारी नोकरी; मोदी सरकारच्या रोजगार मोहिमेला नवे बळ

    Petrol and Diesel : राज्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता; तेलंगणात सर्वाधिक कर लागतो, केंद्राने ₹10 पर्यंत उत्पादन शुल्क कमी केले आहे