• Download App
    Kamal Haasan तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व! कमल हसन

    Kamal Haasan : तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व! कमल हसन यांचा कन्नड भाषेबाबत माफी मागण्यास ठाम नकार

    Kamal Haasan

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : Kamal Haasan ज्येष्ठ अभिनेते कमल हसन सध्या त्यांच्या ‘ठग लाइफ’ या आगामी सिनेमाच्या प्रमाेशनवेळी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फिल्मच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कमल हसन यांनी म्हटले होते की, “कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झाला आहे.” त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात संतापाची लाट उसळली असून, हा वाद थेट न्यायालयात पोहचला आहे.Kamal Haasan

    या वादावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने कमल हसन यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. “तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही. कर्नाटकातून तुम्ही करोडो रुपये कमवता, जर कन्नड लोकांची गरज नसेल, तर इथून कमवणं थांबा,”.



    तरीदेखील कमल हसन यांनी आपले विधान मागे घेतलेले नाही. चेन्नईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली. “तामिळ ही माझी ओळख आहे, माझं जीवन आणि अस्तित्वही आहे. मी माफी मागणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरही कमल हसन यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. अनेक कन्नड संघटनांनी त्यांच्या चित्रपटाच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे ‘ठग लाइफ’ सिनेमा कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही, तर ५ जूनपासून इतर राज्यांमध्ये तो रिलीज होईल, असे सांगण्यात आले आहे.

    ‘ठग लाइफ’ या सिनेमाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून, चित्रपटाची संकल्पना, भव्यता आणि तंत्रज्ञान यामुळे तो आधीपासूनच चर्चेत आहे. मात्र कमल हसन यांचे विधान सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रतिकूल परिणाम करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    Tamil is my life, my existence! Kamal Haasan firmly refuses to apologize for Kannada language

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू

    Sonam Wangchuk : केंद्राने सुप्रीम कोर्टात म्हटले- वांगचुक सीमावर्ती भागात लोकांना भडकावत होते, एखाद्या चिनी व्यक्तीने असे काही म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते