• Download App
    Aadhaar-PAN ओळखपत्रांसाठी संयुक्त पोर्टल आणणार;

    Aadhaar-PAN : ओळखपत्रांसाठी संयुक्त पोर्टल आणणार; आधार-पॅनमध्ये आता एकाच वेळी नाव-पत्ता-नंबर बदलेल

    Aadhaar-PAN

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Aadhaar-PAN आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी आता लोकांना वेगवेगळ्या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टिम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील.Aadhaar-PAN

    पोर्टल कसे काम करेल?

    सर्व डेटा एकत्रित व्हावा अशा पद्धतीने पोर्टल डिझाइन करण्यात येत आहे. म्हणजे पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टसारखे ओळखपत्र एकत्रित होतील. आवश्यक बदलासाठी पोर्टलवर गेल्यानंतर कुठे बदल करायचा याचे पर्याय येतील. जसे की, मोबाइल नंबर बदलायचा असेल तर वेगळा पर्याय, पत्ता बदलायचा असेल तर वेगळा पर्याय असेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर सबमिट बटण दाबताच आवश्यक बदल प्रोफाइलवर दिसू लागतील. तीन दिवसांत ते अपडेट होतील.



    सध्या चाचणी, लवकरच प्रारंभ

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या याची चाचणी सुरू आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी होत्या. त्यांचे निवारण अंतिम टप्प्यात. खास करून डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक फूलप्रूफ व्यवस्था बनवण्याचे आव्हान होते. ते पूर्ण केले जात आहे. सध्या जी चाचणी करण्यात आली, त्यात ९२ टक्क्यांहून जास्त अचूकता दिसून आली.

    ९८ टक्के वा त्याहून अधिक अचूकता मिळवताच ते परीक्षणासाठी लागू करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांतच सर्वसामान्य लोकांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात येईल. म्हणजे लवकरच ते लोकांच्या सेवेत कार्यरत होऊ शकते.
    सध्या पोर्टलचे नाव ठरलेले नाही. अंतिम परीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे नाव निश्चित केले जाईल.
    नवे ओळखपत्र कसे मिळेल?

    बदलांसह नवे ओळखपत्र मिळवण्यासाठीही या पोर्टलवर एक पर्याय असेल. त्यासाठी पोर्टलवर शुल्क भरण्यासह अर्जही करावा लागेल.
    सात कामकाजाच्या दिवसांत नव्या अपडेटसह ओळखपत्र पोस्टाद्वारे लोकांच्या घरी येईल. ज्या लोकांना कार्यालयात जाऊन ओळखपत्र घ्यायचे असेल तर तोही पर्याय उपलब्ध असेल.
    पर्याय निवडल्यानंतर त्यांना मोबाइलवर अपडेटेड ओळखपत्र मिळण्याची तारीख आणि वेळ कळेल.

    Joint portal to be introduced for identity cards; Name-address-number will now be changed simultaneously in Aadhaar-PAN

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हिंसाचाराच्या समर्थनार्थ व्हाट्सअॅप स्टेटस पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

    ED office : मुंबईतील ED कार्यालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

    Pahalgam attack : माध्यमांनी सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये; पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची सूचना