• Download App
    जगातील पहिले कमर्शियल अँटीव्हायरस बनवणारे जोहान मॅकॅफी यांची स्पेनच्या जेलमध्ये आत्महत्या। Johann McAfee, the world's first commercial antivirus maker, has been found dead in a Spanish prison.

    जगातील पहिले कमर्शियल अँटीव्हायरस बनवणारे जोहान मॅकॅफी यांची स्पेनच्या जेलमध्ये आत्महत्या

    वृत्तसंस्था

    बार्सिलोना : अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसंच मकॅफेचे संस्थापक जॉन मॅकॅफी हे स्पेनमधील तुरुंगात मृतावस्थेत आढळले. बार्सिलोनामधी तुरुंगात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ महिने तुरुंगात राहिल्याने ते निराश झाले होते, अशी माहिती त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिली. स्पेनमधील न्यायालयाने नुकतीच जॉन मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली होती. Johann McAfee, the world’s first commercial antivirus maker, has been found dead in a Spanish prison.

    जॉन मॅकॅफी (वय ७५) यांनी जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ बनवलं होतं. “जर मला अमेरिकेत दोषी ठरवलं तर संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल,” असं त्यांनी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. “स्पॅनिश न्यायालयाला हा अन्याय दिसेल अशी मला आशा आहे. अमेरिका मला एका उदाहरणाप्रमाणे वापरु इच्छतो,” असं ते म्हणाले होते.



    जॉन मॅकॅफी जेलमध्ये कसे पोहोचले?

    जॉन मॅकॅफी अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या प्राधिकरणांपासून पळ काढत आहेत. काही काळ ते यॉटवरही राहिले. मॅकॅफी यांच्यावर करचोरीचा आरोप आहे. टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
    मागील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ब्रिटिश पासपोर्ट वापरुन ते इस्तांबूल जात होते.

    जॉन मॅकॅफी यांचे अँटीव्हायरस

    जॉन मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांसाठी काम केलं होतं. १९८७ मध्ये त्यांनी जगातील पहिलं कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवलं होतं.  जॉन यांनी २०१११ मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. ते या व्यवसायात नव्हते. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम त्यांच्याच नावाने सुरु आहेत. जगभरात सुमारे 50 कोटी यूजर या अँटी व्हायरसचा वापर करतात. जॉन मॅकॅफी यांनी २०१९.मध्ये म्हटलं होतं की ‘वैचारिक कारणां’मुळे त्यांनी आठ वर्षांपासून अमेरिकेला आयकर दिलेला नाही.

    Johann McAfee, the world’s first commercial antivirus maker, has been found dead in a Spanish prison.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट