विशेष प्रतिनिधी
रांची : शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालापेक्षा सुंदर बनविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचाच एक भाऊ झारखंडचा कॉँग्रेस आमदार निघाला आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना रनौटच्या गालापेक्षा चांगले करण्याचे आश्वासन दिले आहे.Jharkhand Congress MLA Gulabrao Patil’s brother !, says he will build more beautiful roads than Kangana’s cheek
झारखंड जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी यांनी म्हटले आहे की कंगणाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार, त्यामुळे आदिवासी मुले तरुण आणि व्यापारी वगार्ला याचा मोठा फायदा होईल.
अन्सारी यांनी आपल्या मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजुर करुन घेतले आहेत. या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात बोलताना अन्सारी यांची जिभ घसरली. त्यावेळी त्यांनी रस्त्याची तुलना कंगनाच्या गालाशी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी जळगावात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीच्या गालाची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांशी केली होती. त्यानंतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती .
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गुलाबरावांनी आपल्या गालाच्या वक्तव्यावरुन माफी मागितली होती.
Jharkhand Congress MLA Gulabrao Patil’s brother !, says he will build more beautiful roads than Kangana’s cheek
महत्त्वाच्या बातम्या
- महसूली न्यायालयाने प्रथमच दिला संस्कृतमध्ये निर्णय,झाशीच्या न्यायालयात दोन खटल्यांवर निर्णय
- श्रीराम मंदिराचे बांधकाम हजार वर्षे अबाधित राहणार ,फेब्रुवारी पासून मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात
- भाजप नेत्यांचे मौन सुटले : समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल
- चंद्रकांत पाटलांनी उत्तर प्रदेशमधील गळतीकडे लक्ष द्यावे , जयंत पाटलांची टीका