• Download App
    JDUचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीत अखेरचा घेतला श्वास, पक्षात शोककळा|JDU national general secretary Rajiv Ranjan dies of heart attack; He breathed his last in Delhi, mourning in the party

    JDUचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीत अखेरचा घेतला श्वास, पक्षात शोककळा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्या मुलांनी त्यांना रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.JDU national general secretary Rajiv Ranjan dies of heart attack; He breathed his last in Delhi, mourning in the party

    राजीव रंजन हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे होते. ते नालंदाच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते मध्यप्रदेशातील विद्युत मंडळाचे अध्यक्ष होते.



    राजीव रंजन यांच्या निधनाने जनता दल युनायटेडचे ​​मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होते. नितीश कुमार यांनी नुकतेच त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते या दोन्ही पदांची जबाबदारी दिली होती.

    गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी राजीव रंजन यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले होते. त्यांना राष्ट्रीय प्रवक्त्याची भूमिकाही देण्यात आली होती.

    मुख्यमंत्री नितीश यांनी दुःख व्यक्त केले

    राजीव रंजन यांच्या निधनावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राजीव रंजन हे कुशल राजकारणी आणि समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. दिवंगत आत्म्याला चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खाच्या प्रसंगी धीर सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

    त्याचबरोबर जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल परिवाराला बळ देवो.

    JDU national general secretary Rajiv Ranjan dies of heart attack; He breathed his last in Delhi, mourning in the party

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के