विशेष प्रतिनिधी
ठाणे ,: सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे ( Jaydeep Apte )याला बुधवारी सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झाले होते.
आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याण मधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असे लिहिण्याचा त्यांचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. आपटे यांच्या विषयी माहिती घेतली होती.
तसेच त्यांच्या पत्नी त्यांच्या कल्याण मधील घरी परतल्या होत्या. जयदीप आपटे यांना तात्काळ अटक पोलीस पथके मागावर होती. बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की आपटे हा त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याण मधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. आपल्याला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले आहे. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, आज सकाळी जयदीप आपटे याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे
Jaydeep Apte Arrested Over Rajkot Statue Collapse: Maharashtra Police Take Action
महत्वाच्या बातम्या
- Dharma Shastra : शास्त्रात अस्पृश्यतेला स्थान नाही, मग भेदाभेद अमंगळ कशासाठी??; भागवतांचा सवाल; कालसुसंगत वेदज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन!!
- Manoj Jarange : विषय कुठलाही पुढे आला की तो फडणवीसांना नेऊन भिडवा!!; मनोज जरांगेंचा एककलमी कार्यक्रम
- Kolkata Rape Case: संदीप घोष यांना मारण्याचा प्रयत्न, जमावाकडून ‘चोर’, ‘चोर’च्या घोषणा
- Nana patole : महाविकास आघाडीचा जोर संख्याबळावर; काँग्रेसचे “भावी मुख्यमंत्री” नाना कार्यकर्त्यांच्या खांद्यावर!!