जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट. Jammu and Kashmir
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी, भाजपने सोमवारी सकाळी एक यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 44 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती, परंतु काही तासांनंतर पक्षाने ही यादी मागे घेतली. यानंतर भाजपने काही दुरुस्त्या करून उमेदवारांच्या नावांची नवी यादी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण 15 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत.
नवी यादी जारी करताना, भाजपने सांगितले की भारतीय जनता पार्टी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 2024 च्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची पहिली यादी आज सोमवार, 26 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी आज जाहीर केलेली उमेदवारांची यादी अवैध मानली जावी.
भाजपने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात इंजिनियर सय्यद शौकत गयूर अंद्राबी यांना पंपोरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजपोरा येथून अर्शिद भट्टला तिकीट देण्यात आले आहे. भाजपने जावेद अहमद कादरी यांना शोपियांमधून उमेदवारी दिली आहे. तर अनंतनाग पश्चिममधून मोहम्मद रफिक वानी आणि अनंतनागमधून वकील सय्यद वजाहत यांना तिकीट देण्यात आले आहे. Jammu and Kashmir
Jammu and Kashmir elections BJP announced list of 15 candidates
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची निम्म्याहून अधिक उमेदवारांची नावे ठरली
- UPS : महायुती सरकारने UPS ला दिली मान्यता, केंद्राची नवीन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!
- विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!
- Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- काँग्रेसने आमचा अजेंडा मान्य केल्यास युतीसाठी तयार; PDPचा जाहीरनामा प्रसिद्ध