• Download App
    लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यामध्ये आता जोडला जाणार ; पुन्हा जनरल कोचचा डबा; सामान्य प्रवाशांना दिलासा।  It will now be connected to long-distance trains General Coach bogy again; Consolation to ordinary passenger

    लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यामध्ये आता जोडला जाणार ; पुन्हा जनरल कोचचा डबा; सामान्य प्रवाशांना दिलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना काळात निर्बंध सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून जनरल डबा काढून टाकला होता. प्रवाशांना तेव्हापासून द्वितीय श्रेणीसाठीही आगाऊ आरक्षण करावे लागत होते. पण अनारक्षित तिकिटांची विक्री झाल्यानंतर प्रवाशांना लवकरच जनरल तिकीट खरेदी करून जनरल डब्यातून प्रवास करता येणार आहे. It will now be connected to long-distance trains General Coach bogy again; Consolation to ordinary passenger

    रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन गाड्यांमधील जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या गरीब, सामान्य प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.



    रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात, पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या पूर्ववत करण्यात आल्या असून जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना आता पूर्वीप्रमाणेच जनरल तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आता जनरल तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

     It will now be connected to long-distance trains General Coach bogy again; Consolation to ordinary passenger

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’